• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • मोठी बातमी! कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 31 वर्षात पुणे फेस्टिव्हलला पहिल्यांदा ब्रेक

मोठी बातमी! कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 31 वर्षात पुणे फेस्टिव्हलला पहिल्यांदा ब्रेक

राज्यात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहे.

  • Share this:
पुणे, 29 जुलै: राज्यात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहे. त्यामुळे गेल्या 31 वर्षे सातत्याने होत असलेला पुणे फेस्टिव्हलला यंदा पहिल्यांदाच ब्रेक लागला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 21 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 या गणेशोत्सव काळामध्ये संपन्न होणारा पुणे फेस्टिव्हल रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे चेअरमन सुरेश कलमाडी यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. प्रथेप्रमाणे पुणे फेस्टिव्हल यंदा केवळ श्रींची प्रतिष्ठापना आणि विसर्जन विधिवत संपन्न होणार आहे. हेही वाचा..31 जुलैनंतरही लॉकडाऊन ठेवण्यात येईल का? मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला मोठा निर्णय लोकमान्य टिळकांच्य प्रेरणेतून सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचला आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन कला- संस्कृती, गायन-वादन, नृत्य, संगीत व क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या पुणे फेस्टिव्हलचं आयोजन पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यट विकास महामंडळ आणि भारत सरकारच पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते. पुणे फेस्टिव्हलने पुण्याचे नाव जगाच्या पर्यटन नकाशावर नेलं आहे. सलग 10 दिवस आणि सातत्यानं 31 वर्ष अखंडीत चालू असलेला पुणे फेस्टिव्हल हा देशातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातो. मात्र, यंदा कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे पुणे फेस्टिव्हल रद्द करण्यात आला आहे. पुण्यात कोरोनाने ओलांडली धोक्याची पातळी... दरम्यान, राज्याची राजधानी मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे. पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्येनं आता 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची गेल्या 24 तासातील आकडेवारी समोर आली आहे. मंगळवारी दिवसभरात संपूर्ण जिल्ह्यात तब्बल 2618 कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतही रुग्णांची मोठी वाढ झाली आहे. रुग्णांची संख्या तब्बल 1100 ने वाढली आहे. हेही वाचा...मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा ठरला, असा आहे कार्यक्रम! एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली तर दुसरीकडे मृतांची संख्याही पन्नासहून अधिक आहे. दिवसभरात 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 1792 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पुणे शहरात कोरोनाबाधित 50 हजार रुग्णांची संख्या झाली आहे तर संपूर्ण जिल्ह्यात 75 हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईनंतरही सर्वात मोठी रुग्ण संख्या आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: