"सुशांतची गॅझेट्स अजूनही रियाकडेच", पुराव्यानिशी कंगनाने केले खळबळजनक आरोप

रियाने सुशांतचे पैसे लुटले त्याची आवश्यक कागदपत्रे, महत्त्वाच्या वस्तू बळाकावल्या असा आरोप सुशांतच्या कुटुंबाने केला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण मिळू लागलं आहे. नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. सुशांतच्या कुटुंबाने थेट सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर (rhe chakraborty) गंभीर असे आरोप लावले आहेत. रियाने सुशांतचे पैसे लुटले त्याची आवश्यक कागदपत्रे, महत्त्वाच्या वस्तू बळाकावल्या असं त्याच्या वडीलांनी सांगितलं आणि आता अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut) सुशांतची गॅझेट्स अजूनही रियाकडेच आहेत, असा खळबळजनक आरोप केला आहे.

कंगनाच्या टीमने ट्विटरवर एका युझरचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये सुशांतने अभिनेत्री आलिया भट्टला फॉलो केलं आहे. सुशांत आलियाला फॉलो करत असल्याचं नोटिफिकेशन आपल्याला आलं तेव्हा सुशांत या जगात नव्हता, असं या युझरने म्हटलं आहे. त्यामुळे सुशांतचा सिंह राजपूतचा स्मार्टफोन कोण वापरत आहे? असा प्रश्न त्याने उपस्थित केला होता.

हाच स्क्रिनशॉट रिट्वीट करत कंगनाच्या टीमने ट्वीट केलं आहे.  या प्रकरणाची सीबीआय तपासणी व्हायला हवी. सुशांतचे सर्व गॅझेट्स रियाकडे आहेत. कदाचित महेश भट्ट यांनी आलियाला फॉलो करायला सांगितलेलं असू शकतं. त्याचे कित्येक पोस्टही डिलीट करण्यात आलेत.

हे वाचा - 'सत्याचा विजय होतो',रियावर FIR दाखल झाल्यानंतर EX-गर्लफ्रेंड अंकिताचे सूचक ट्वीट

दरम्यान गेल्या 6 महिन्यांपासून रिया सुशांतबरोबर राहत होती. तिने महेश भट्ट यांना त्याला मानसिक आधार देण्यासाठी बोलवलं. आणि त्याच्या मृत्यूच्या 2 दिवसांपूर्वी अत्यंत गूढपणे सर्वजण गायब झाले आणि यावरूनही कंगनाने आश्चर्य व्यक्त केलं होतं.

हे वाचा - सलमान आणि संजय दत्तचे वकील सतीश मानेशिंदे लढणार रियाची केस; फी वाचून बसेल धक्का

सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनानंतर सातत्याने मुंबई पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या परिवाराविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. याप्रकरणी आता बिहार पोलीस देखील तपास करत आहे.

Published by: Priya Lad
First published: July 29, 2020, 6:30 PM IST

ताज्या बातम्या