जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / दाऊदच्या जवळीकीमुळे सर्वस्व गमावलं, आज सर्वांपासून दूर आहे राज कपूर यांची ‘गंगा’

दाऊदच्या जवळीकीमुळे सर्वस्व गमावलं, आज सर्वांपासून दूर आहे राज कपूर यांची ‘गंगा’

दाऊदच्या जवळीकीमुळे सर्वस्व गमावलं, आज सर्वांपासून दूर आहे राज कपूर यांची ‘गंगा’

एका रात्रीत स्टार होणं काय असतं हे मंदाकिनीशिवाय दुसरं कोणीच सांगू शकत नाही. पण आयुष्यात अशा काही गोष्टी घडत गेल्या की यश ज्या वेगाने मिळालं त्याच वेगाने ते निघूनही गेलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 3 मे- यास्मीन जोसेफ हे नाव उच्चारल्यावर कदाचित तुम्हाला आम्ही कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय हे कळणार नाही. पण जर मंदाकिनी हे नाव घेतलं तर लगेच ती अभिनेत्री आठवेल. एका रात्रीत स्टार होणं काय असतं हे मंदाकिनीशिवाय दुसरं कोणीच सांगू शकत नाही. पण आयुष्यात अशा काही गोष्टी घडत गेल्या की यश ज्या वेगाने मिळालं त्याच वेगाने ते निघूनही गेलं. सेटवर बाळाला दुध पाजताना अभिनेत्रीचा फोटो व्हायरल, युजर्स म्हणाले…! 1985 मध्ये आलेल्या ‘राम तेरी गंगा मेली’ सिनेमातून मंदाकिनी यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आर.के. बॅनरची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे हिरो होते राज कपूर यांचा भाऊ राजीव कपूर तर अभिनेत्री होती 16 वर्षांची मेरठची मंदाकिनी. टीव्हीची ‘ही’ स्टार अभिनेत्री आहे चक्क 10 महिन्यांची गरोदर पहिल्या दिवसापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. एका रात्रीत मंदाकिनी हे नाव देशभरात प्रसिद्ध झालं होतं. या सिनेमाने मंदाकिनीला त्या सर्व गोष्टी दिल्या, ज्याची इतर अभिनेत्रींना आयुष्यभर आस असते. या सिनेमानंतर मंदाकिनीकडे सिनेमांच्या ऑफरची रांग लागली होती. 1985 ते 1990 या पाच वर्षात मंदाकिनीने मिथुन चक्रवर्तीसोबत ‘डांस डांस’, गोविंदासोबत ‘प्यार करके देखो’ आणि अनिल कपूरसोबत ‘तेजाब’ अशा हिट सिनेमांत काम केलं. 1990 नंतर मात्र सगळी गणितं बदलली. या काळात तिचं नाव कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं. वृत्तपत्रात मंदाकिनी आणि दाऊदच्या नात्याबद्दल रकानेच्या रकाने लिहिले जाऊ लागले. जर दिवशी त्यांचे फोटो छापले जात होते. या सगळ्यात मंदाकिनीने कधीच त्यांच्यातील प्रेमसंबंध मान्य केले नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असेच ती बोलत राहिली. सलमानच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्यावर भडकलेला सोहेल खान, म्हणाला- आता लोकांसमोर रडतेय पण तेव्हा तर… 12 मार्च 1993 मध्ये मुंबईत साखळी बॉम्ब हल्ले घडवण्यात आले. या हल्ल्याचा मुख्य आरोपी म्हणून दाऊद इब्राहिमचं नाव समोर आलं. या तपास कार्यात अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर आली. पण एव्हाना मंदाकिनीचं नाव दाऊदसोबत जोडल्या गेल्यामुळे तिचीही चौकशी करण्यात आली होती. तेव्हा असं म्हटलं जायचं की दाऊद आणि मंदाकिनीने लग्न केलं असून त्यांना दोन मुलंही आहेत. पण याबद्दल दाऊदने आणि मंदाकिनीने कधीच कोणतं स्पष्टीकरण दिलं नाही. मुंबईमध्ये रजनीकांत यांच्या टीमवर दगडफेक टपरीवर पुरंदरची भेळ आणि उसाचा रस, आमिर-किरणचा VIDEO व्हायरल

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात