मुंबईमध्ये रजनीकांत यांच्या टीमवर दगडफेक

मुंबईमध्ये रजनीकांत यांच्या टीमवर दगडफेक

या प्रकारावर अद्याप सिनेमातील कोणत्याही कलाकाराकडून किंवा दिग्दर्शकाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

  • Share this:

मुंबई, २ मे : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाचं शूटिंग सध्या मुंबईमध्ये सुरू असून काही दिवासांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर फिरतानाचे रजनीकांत यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या ते ए. आर. मुरुगादास यांच्या 'दरबार' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. मात्र मुंबईमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू असताना तिथल्या एका कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सिनेमाच्या टीमवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

 

View this post on Instagram

 

#rajinikanth snapped at on location for is upcoming movie

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

India’s Most Wanted Trailer- मलायकाच्या प्रेमात आकंठ बुडालेला अर्जुन कपूर जेव्हा देशासाठी जीवही द्यायला तयार होतो

रजनीकांत सध्या 'दरबार' सिनेमाचं  शूटिंग नुकतंच मुंबईतील एका कॉलेजच्या आवारात सुरू होती. यावेळी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शूटिंग पाहण्यासाठी गर्दी केली होती मात्र सिनेमातील सीन किंवा व्हिडिओ लिक होऊ नये यासाठी सिनेमाच्या टीमनं या विद्यार्थांना सेटपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चिडलेल्या विद्यार्थ्यांनी या टीमवरच दगडफेक करायला सुरुवात केली. त्यामुळे सिनेमाच्या दिग्दर्शकांना कॉलेज मनेजमेंटकडे धाव घ्यावी लागली. या सर्व प्रकारणात पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सिनेमाच्या शूटिंगचं लोकेशन बदलण्यात आलं असून आता हे शूटिंग पुन्हा नव्यानं केलं जाणार आहे.

डिंपल कपाडिया सोबतच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अखेर बोलला सनी देओल

 

View this post on Instagram

 

Being humble #rajnikant

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

या प्रकारावर अद्याप सिनेमातील कोणत्याही कलाकाराकडून किंवा दिग्दर्शकाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 'दरबार' सिनेमाच्या निमित्तानं सुपरस्टार रजनीकांत तब्बल 25 वर्षांनंतर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. रजनीकांत यांच्या व्यतिरिक्त या सिनेमात अभिनेत्री नयनताराही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

प्रियांकाच्या दीराने लास वेगासमध्ये केलं Game Of Throne च्या अभिनेत्रीशी लग्न

First published: May 2, 2019, 5:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading