मुंबई, 2 मे- हिंदी टीव्ही सृष्टीतली नावाजलेली अभिनेत्री छवी मित्तल गरोदर असल्याचं तर साऱ्यांनाच माहीत आहे. पण सध्या ती सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे ट्रेण्ड करत आहे. छवीने तिचे नऊ महिने पूर्ण केले असून ती 10 आता 10 महिन्यांची गरोदर आहे. सर्वसामान्यपणे नऊ महिने आणि नऊ दिवसांत बाळाचा जन्म होतो. पण छवीने हे दिवस केव्हाच पार केले असून अजूनही तिला प्रसुती वेदना येत नाहीयेत.
...और प्यार हो गया ! 'या' व्यक्तीमुळे सुरू झाली निक-प्रियांकाची लव्हस्टोरी
35 वर्षीय छवीने 2005 मध्ये मालिकांचा दिग्दर्शक मोहित हुसैनशी लग्न केलं. लग्नाच्या सात वर्षांनी 20 डिसेंबर 2012 मध्ये छवीने आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला. मोहित आणि छवीने मुलीचं नाव अरीझा असं ठेवलं. आता छवी दुसऱ्यांदा आई होत असून कोणत्याही क्षणी त्यांच्या घरी नवीन पाहूणा येऊ शकतो.
VIDEO-...म्हणून आईचा हात सोडून आराध्या बाबा अभिषेककडे पळत गेली
छवी सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या आरोग्याशी निगडीत अनेक अपडेट चाहत्यांना देत असते. गरोदरपणातील तिचे मूड स्विंग, डाएट, फिटनेस सर्व विषयांवर ती सातत्याने व्यक्त होत असते. पण छवीने नुकत्याच केलेल्या पोस्टमुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे. या पोस्टमध्ये ती १० महिन्यांची गरोदर असल्याचं तिने म्हटलं होतं. तिने असं का म्हटलं याचचं स्पष्टीकरण तिने आता दिलं आहे.
डिंपल कपाडिया सोबतच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अखेर बोलला सनी देओल
‘अनेकांना आतापर्यंत गरोदरपणाचे नऊ महिनेच असतात असं माहीत होतं. पण काही महिला 10 महिन्यांच्याही गरोदर असतात. हे खोटं नसून सत्य आहे. सध्या मी ते आयुष्य जगत आहे. अनेकांना वाटलं मी चुकीचं लिहिलं आणि ते माझी चूक सुधारत होते. पण हे चुकीचं नसून जाणीवपूर्वक पद्धतीने लिहिले आहे. जेव्हा नववा महिना संपतो त्यानंतर 10 वा महिना सुरू होतो. गरोदरपणात 36 आठवड्यांनंतर कधीही प्रसुती होऊ शकते. 40 आठवडे हा पूर्ण काळ समजला जातो आणि त्यावेळी डॉक्टर तुम्हाला तारीख देतात.’
प्रियांकाच्या दीराने लास वेगासमध्ये केलं Game Of Throne च्या अभिनेत्रीशी लग्न
तुम्हाला कधी प्रसुती वेदना येतील याबद्दल ठामपणे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या तारखाही बदलू शकतात. त्यातही तुम्ही जर दुसऱ्यांदा गरोदर होत असाल तर कधी कधी तुम्ही 42 आठवड्यांपर्यंतही गरोदर राहू शकता. यात जगावेगळं असं काही नाही. सध्या मी फार निवांत आहे. कारण मला माहीत आहे जेव्हा बाळ या जगात येईल मला एक मिनिटाचीही उसंत मिळणार नाही. त्यामुळे प्रसुती वेदना कधी येणार हे माझ्या किंवा डॉक्टरांच्या हातात नसून हे पूर्णपणे बाळाच्या हातात आहे.
Viral होतेय प्रियांका चोप्रा आणि निक जोनसची पब्लिक किस
टपरीवर पुरंदरची भेळ आणि उसाचा रस, आमिर-किरणचा VIDEO व्हायरल