सेटवर बाळाला दुध पाजताना अभिनेत्रीचा फोटो व्हायरल, युजर्स म्हणाले...!

मालिकेचं शुटिंग सुरू असतानाही आईचं कर्तव्य निभावणाऱ्या या अभिनेत्रीचं संपूर्ण जगभरातून कौतुक होत आहे.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 07:23 PM IST

सेटवर बाळाला दुध पाजताना अभिनेत्रीचा फोटो व्हायरल, युजर्स म्हणाले...!

अमेरिका, 02 मे : प्रसिद्ध मालिका 'Game of Thrones' मध्ये यारा ग्रेजॉय (Yara Greyjoy)ची भूमिका साकारणारी अभिनेत्री ग्रेम्मा वेहलनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ग्रेम्माने सोशल मीडियावर बाळाला दुध पाजतानाचा एक फोटो शेअर केला आहे. जो फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मालिकेचं शुटिंग सुरू असतानाही आईचं कर्तव्य निभावणाऱ्या या अभिनेत्रीचं संपूर्ण जगभरातून कौतुक होत आहे. गेम्माचं कौतुक करत फोटोवर लोकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. गेम्मा या पुरस्काराच्या पात्र आहेत. आपलं काम आणि आपलं आई असल्याचं कर्तव्य त्या उत्तम निभावत असल्याचं लोकांनी म्हटलं आहे.

या फोटोवर 'गेम ऑफ थ्रोन्स' या मालिकेचे निर्माते 'HBO' नेदेखील कमेंट केली आणि ग्रेम्मा यांचं कौतुक केलं. या कमेंटमध्ये त्यांनी लिहलं की, 'एक आक्रमक योद्ध आणि एक प्रेमळ आई'. इतकंच नाही तर अशा आईची गरज असल्याची कमेंटसुद्ध एका महिला युजरने केली आहे.


सगळेच जण ग्रेम्माच्या या फोटोचं आणि कामाचं कौतुक करत आहेत. खरंतर कामाचा बोजा इतका असतो की स्टार्स काय सामान्य लोकांकडूनही मुलांकडे दुर्लक्ष होतं. पण एवढा स्टार चेहरा असतानाही आपल्या मुलांकडे काळजीने लक्ष देणाऱ्या या अभिनेत्रीचं कौतुक होत आहे.

Loading...

शुटिंगवेळी ग्रेम्मा आपल्या बाळाला सोबत ठेवते अशी माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे एका उत्तम आईचं आणि उत्तम अभिनेत्री जगभरात कौतुक होत आहे.


VIDEO : नवरदेवाने घेतला उखाणा, पण उदयनराजेंच्या अ‍ॅक्शनने नवरीच लाजली...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 07:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...