सलमानच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्यावर भडकलेला सोहेल खान, म्हणाला- आता लोकांसमोर रडतेय पण तेव्हा तर...

सलमानच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्यावर भडकलेला सोहेल खान, म्हणाला- आता लोकांसमोर रडतेय पण तेव्हा तर...

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं नातं तर सर्वश्रुत आहे. दोघांचं नात्यात प्रेम होतं मैत्री होत पण काळानुसार हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.

  • Share this:

मुंबई, 2 मे- सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं नातं तर सर्वश्रुत आहे. दोघांचं नात्यात प्रेम होतं मैत्री होत पण काळानुसार हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. प्रेमाची जागा द्वेषाने आणि रागाने घेतली. दोघांच्या नात्याचा शेवट अतिशय वाईट झाला. सलमान ओव्हरपझेसिव्ह असून तो मला मारहाणही करतो असा आरोप ऐश्वर्याने केला होता.

...और प्यार हो गया ! 'या' व्यक्तीमुळे सुरू झाली निक-प्रियांकाची लव्हस्टोरी

एका मुलाखतीत ऐश्वर्याने या साऱ्या गोष्टी शेअर केल्या होत्या. तिच्या या मुलाखतीनंतर सलमानवर साऱ्यांनीच प्रश्नांची तोफ डागली होती. यावर सलमानने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आपल्या भावासाठी सोहेल खानने मात्र पलटवार केला होता.

VIDEO-...म्हणून आईचा हात सोडून आराध्या बाबा अभिषेककडे पळत गेली

सोहेलनेही एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘आता ती सार्वजनिक ठिकाणी रडतेय. पण जेव्हा ती आमच्या घरी यायची आणि सलमानसोबत रहायची. आमच्या कुटुंबाची एक सदस्य झाली होती. तेव्हा तिला या नात्याचा अंदाज आला नव्हता का? खरं तर तिला नात्याचा अंदाज आला नव्हता. याच कारणामुळे सलमान इनसिक्युअर झाला होता. त्याला हे जाणून घ्यायचं होतं की, तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे. पण तिने कधीच याबद्दल जाणीव करून दिली नाही.’

डिंपल कपाडिया सोबतच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अखेर बोलला सनी देओल

एवढं बोलून सोहेल थांबला नाही तर तो पुढे म्हणाला की, ‘ऐश्वर्या अजूनही सलमानच्या टचमध्ये असून ती त्याला सतत फोन करते. नेमकी हीच गोष्ट विवेकला आवडत नाहीये.’ सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्यात विवेक आल्यानंतर दरी निर्माण व्हायला लागली.

प्रियांकाच्या दीराने लास वेगासमध्ये केलं Game Of Throne च्या अभिनेत्रीशी लग्न

दरम्यान, ऐश्वर्याने आरोप केला की, ‘तो माझं को-स्टारसोबत अफेअर असल्याचं म्हणायचा. माझ्यावर नजर ठेवायचा. तो नेहमी म्हणायचा की अभिषेक बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत मी सगळ्यांसोबत असायचे. एकदा तर त्याने मारहाणही केली होती. सुदैवाने तेव्हा मला कोणती दुखापत झाली नव्हती.’

Viral होतेय प्रियांका चोप्रा आणि निक जोनसची पब्लिक किस

तेव्हा सलमानने तिचे मारहाणीचे आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. ऐश्वर्याने २० एप्रिल २००७ मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केलं. अभिषेक आणि ऐश्वर्याने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. लग्नाअगोदर या दोघांनी ढाई अक्षर प्रेम के, धूम, उमराव जान, रावण, कुछ ना कहो आणि गुरु या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.

टपरीवर पुरंदरची भेळ आणि उसाचा रस, आमिर-किरणचा VIDEO व्हायरल

First published: May 2, 2019, 5:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading