जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रसादाच्या थाळीत कांदा का?; अभिनेत्री कंगणा रणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर

प्रसादाच्या थाळीत कांदा का?; अभिनेत्री कंगणा रणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर

प्रसादाच्या थाळीत कांदा का?; अभिनेत्री कंगणा रणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर

अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut) प्रसादाच्या थाळीचा कांदा (onion in prasadam thali) ठेवल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि ती ट्रोल होऊ लागली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 एप्रिल : सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut)  आता तिच्या एका चुकीमुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांकडून ट्रोल (netizens trolled kangana) होत आहे. विशेष म्हणजे कंगनाने यावर शांतपणे प्रतिक्रियादेखील दिली आहे. उत्तर भारतात गुढीपाडव्याच्या दिवसापासून नवरात्र सुरू झाली आहे, तर आज अष्टमी आहे. आणि त्याच निमित्तीने विशिष्ट प्रसाद केला जातो. पण कंगनाने या प्रसादाच्या थाळीत कांद्याच्या (onion in prasadam thali) काही फोडी ठेवल्याने नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. कंगनाने तिच्या ट्विटर अकांउटवर अष्टमी निमित्त हा प्रसाद थाळीचा फोटो शेअर केला होता. आणि त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

जाहिरात

काहींनी लिहिलं प्रसादाच्या थाळीत कांदा? तर काहीजण म्हणाले हिंदूंमध्ये आणि विशेषत: नवरात्रीत कांदा, लसून पूर्णपणे वर्ज्य असतो. तर एकाने लिहिलं हिंदू कधीपासून नवरात्रीत कांदा खाऊ लागले? इतकंच नव्हे तर #onion हा नवा ट्रेंड देखील सुरू झाला. हे वाचा - अभिनेत्री हिना खानवर कोसळला दु:खाचा डोंगर; अगदी जवळच्या व्यक्तीचं निधन त्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा ट्वीट करत यावर स्पष्टीकरण दिलं. “मला विश्वास होत नाही #onion हा टॉप ट्रेंड आहे. हे कोणालाही दुखावण्यासाठी नाही पण ही हिंदू धर्माची सुंदरता आहे की तो इतर धर्मांप्रमाणे कठोर नाही, ते खराब नको करूयात. माझा आज उपवास आहे, पण माझ्या कुटुंबाला जर यासोबत सलाड खायचं असेल तर त्यांना खाऊदे “, असं कंगना म्हणाली. हे वाचा -  ‘आम्ही लठ्ठ आहोत म्हणून…’; Body Shaming वर अक्षया नाईकची सणसणीत चपराक कंगनाच्या या ट्विटनेही नेटकऱ्यांच समाधान मात्र झालं नाही. काहींनी लिहिलं आता  काहीही स्पष्टीकरण देऊ नकोस , तर एकाने कांदा न खाण्याचे फायदे सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात