'आम्ही लठ्ठ आहोत म्हणून...'; मराठी अभिनेत्री अक्षया नाईकची Body Shaming वर सणसणीत चपराक

'आम्ही लठ्ठ आहोत म्हणून...'; मराठी अभिनेत्री अक्षया नाईकची Body Shaming वर सणसणीत चपराक

‘सुंदरा मनामध्ये भरली’ (sundraa manamdhye bharali) मालिकेतील ‘लतिका’(latika) म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईकनं (akshya naik) बॉडी शेमिंगबाबत एक भलीमोठी पोस्ट केली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 एप्रिल  सर्वसामान्य मुलगी असो किंवा अभिनेत्री आज प्रत्येक मुलीला तिच्या वजनावरून हिणवलं (Body shaming) जातं. मुलगी म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येते ती चवळीच्या शेंगेसारखी सडसडीत बारीक देहाची. एखादी मुलगी जर लठ्ठ असेल तर तिला सुंदर समजलचं जात नाही. विद्या बालन पासून छोट्या पडद्यावरील कित्येक अभिनेत्री आजपर्यंत या ‘बॉडी शेमिंग’ला बळी पडल्या आहेत मात्र सध्याच्या काळात अशा काही अभिनेत्री पुढे येत आहेत. ज्या सुंदरतेचं हे माप बदलत आहेत. आपल्या भारीभक्कम शरीरानेसुद्धा चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करत आहेत. नुकतंच ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (sundraa manamdhye bharali) मालिकेतील ‘लतिका’ (latika) म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईकनं (akshya naik insta post) एक पोस्ट करत बॉडी शेमिंग करणाऱ्यांच्या तोंडावर चपराक दिली आहे. पाहा ती नेमकं काय म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

अक्षया म्हणजेच म्हणजेच ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्री लतिका होय. अक्षयाने पोस्ट करत म्हटलं आहे. "जास्त हेल्थी असणाऱ्या मुली खरं तर खूप बिनधास्त असतात. त्या खूप मुक्तपणे जगत असतात. त्यांना वाढलेल्या वजनाचं मुळीचं आश्चर्य वाटतं नाही. उलट त्या खूपच आत्मविश्वासी असतात. हे लोक आपलं शरीर जसं आहे तसं त्याला मान्य करतात. आणि मला ही लोकं खूप आवडतात. पण खूप लोक आम्ही काय आहोत हे न बघता फक्त आम्ही दिसायला कसे आहोत यावरून ओळखतात आणि खरंच हे दुर्दैवी आहे."

"मी नेहमी जास्त वजनाबद्दल सकारात्मकच बोलत असते मात्र आज मी काही वैयक्तिक अनुभव सांगणार आहे आणि ते प्रत्येक जाड व्यक्तीवर लागू होतं. मला माहिती आहे, मी आत्मविश्वासी आहे, बिनधास्त आहे मात्र प्रत्येक व्यक्ती असेलच असं नाही. अनेक लोकं या प्रसंगातून जातात त्यांना आपल्या वजनावरून खूप काही सोसावं लागतं. आपण विचारही करू शकत नाही इतकं ते सहन करतात. माझ्यासारखे लोक प्रत्येकवेळी या समाजापासून स्वतःचं संरक्षण करत असतात. आम्हाला काही फरक नाही पडत, आम्ही जसे आहोत तसे आनंदी आहोत, असं असं म्हणून समाज काय म्हणतंय याकडे फारसं लक्ष देत नाहीत. आणि हे खरंच आहे आम्हाला माहिती आहे आम्ही किती सुंदर आहोत. मात्र प्रत्येकवेळी आम्हाला आमच्या जाड शरीरावरून नाकारलं जातं. आम्हाला अशी जाणीव करून दिली जाते की आम्ही सुंदर नाही"

हे वाचा -  Shocking! गोविंदाची भाची करणार होती आत्महत्या; या कारणामुळे वाचलं आयुष्य

"मला हेसुद्धा माहिती आहे शाळेमध्ये कॉलेजमध्ये सुद्धा आम्हाला नकारच मिळतो. कारण प्रत्येकाला बारीक, सुंदर मित्रमैत्रीण हवी असते. त्यामुळे आम्हाला डावललं जातं. कोणालाच असं वाटत नाही की जाड व्यक्तीसुद्धा सुंदर असू शकतात. बरेच लोक माझ्याजवळ येतात आणि मला म्हणतात तुम्ही जाड आहात पण सुंदर आहात. मला हे हास्यास्पद वाटत, मला असं वाटत माझ्या सुंदर असण्याचा आणि माझा वजनाचा काय संबंध आहे"

हे वाचा - अमिताभ बच्चन यांनी बाबिलला दिल्या बॉलिवूड पदार्पणासाठी शुभेच्छा; म्हणाले...

तसंच अक्षया म्हणते, "मला असं वाटत प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आत्मविश्वासी असतील किंवा आत्मविश्वासी नसतीलच असंही नाही. त्यामुळे कृपा करून एखाद्याला त्याच्या शरीरावरून त्याला ओळखणं बंद करा. त्यांच्या शरीरासोबत त्यांच्या भावनासुद्धा आहेत त्यांचाही विचार करा", अशा आशयाची लांबलचक पोस्ट लिहित अक्षयाने बॉडी शेमिंग करणाऱ्यांवर रोष व्यक्त केला आहे

Published by: Aiman Desai
First published: April 20, 2021, 7:12 PM IST

ताज्या बातम्या