Home /News /entertainment /

अभिनेत्री हिना खानवर कोसळला दु:खाचा डोंगर; अगदी जवळच्या व्यक्तीचं निधन

अभिनेत्री हिना खानवर कोसळला दु:खाचा डोंगर; अगदी जवळच्या व्यक्तीचं निधन

अभिनेत्री हिना खानला (hina khan) मोठा धक्का बसला आहे.

  मुंबई, 20 एप्रिल-  2020 प्रमाणे 2021 सुद्धा अनेक दु:खद बातम्या घेऊन येत आहे. कलाकारांसाठी सुद्धा हे वर्ष पुन्हा एकदा वाईट ठरत आहे. अनेक कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. नुकतेच अभिनेते किशोर नांदलसकर यांचं निधन झालं. त्यातच आता अभिनेत्री हिना खानच्या जवळच्या व्यक्तीच्या निधनाची बातमी समोर येत आहे. हिना खानच्या वडिलांचंही निधन (hina khan's father passes away) झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचं आज निधन झालं आहे. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं आहे. हिना सध्या कामानिमित्त काश्मीरमध्ये होती. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच ती मुंबईसाठी रवाना झाली आहे. हिना खान जितकी चांगली अभिनेत्री आहे तितकीच चांगली मुलगीसुद्धा आहे.
  View this post on Instagram

  A post shared by HK (@realhinakhan)

  हिना खान आपल्या वडिलांच्या खूपच जवळ होती. ती सतत आपल्या सोशल मीडियावर आपल्या वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत होती. यामध्ये त्यांच्यातील प्रेम नेहमीच दिसून येत होतं. ती सतत आपल्या चाहत्यांसाठी आपल्या कौटुंबिक गोष्टी शेअर करत असते. वडिलांच्या निधनाने हिनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे वाचा - मनोरंजन विश्वातील 'राजा' हरपला, अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन हिना खान ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील ‘अक्षरा’ या पात्राने ती घराघरात पोहोचली होती. हिना खानला छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणलं जातं. त्याचबरोबर हिना बिग बॉसमध्ये सुद्धा झळकली होती. त्यातसुद्धा प्रेक्षकांनी तिला चांगली पसंती दर्शवली होती. हे वाचा - गिरगांवची गल्ली ते युरोपची रंगभूमी; किशोर नांदलस्कर यांचा थक्क करणारा प्रवास वडिलांच्या अचानक जाण्यानं हिना खानला मोठा धक्का बसला आहे. हिनासाठी सध्या हा खूपच कठीण काळ आहे. ही माहिती समजताच सर्वजण हिना आणि हिनाच्या कुटुंबाला हे सहन करण्याची ताकत मिळावी अशीच प्रार्थना करत आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Hina khan, Tv actress

  पुढील बातम्या