मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मनोरंजन क्षेत्रात पुन्हा खळबळ! आणखी एका अभिनेत्याची आत्महत्या

मनोरंजन क्षेत्रात पुन्हा खळबळ! आणखी एका अभिनेत्याची आत्महत्या

सुशांत सिंह राजपूतसारखाच गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला.

सुशांत सिंह राजपूतसारखाच गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला.

सुशांत सिंह राजपूतसारखाच गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला.

  चेन्नई, 06 फेब्रुवारी : पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्राला धक्का बसला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूतून कित्येक जण सावरत असताना आता आणखी एका अभिनेत्यानं आपलं आयुष्य संपवलं (Actor suicide) आहे. अभिनेता श्रीवास्तव चंद्रशेखरनं (Srivatsav Chandrasekar) आत्महत्या केली आहे. गळफास घेऊन त्यानं आपल्या आयुष्याचा शेवट केला.

  श्रीवास्तव चंद्रशेखर हा साऊथ अभिनेता. फिल्मी बीटच्या रिपोर्टनुसार चंद्रशेखरनं 4 फेब्रुवारी, 2021 ला आत्महत्या केली. त्याच्या वडीलांच्या घरात त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. हे घर व्यावयसायिक कारणासाठी वापरलं जात होतं.

  चेन्नईच्या पेरांबूरमध्ये शूटिंगसाठी जात असल्याचं त्यानं आपल्या कुटुंबाला सांगितलं होतं. त्यानं आत्महत्या का केली यामागी कारण अद्याप समजलेलं नाही. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. शुक्रवारी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  श्रीवास्तव हा वल्लमई थारायो (Vallamai Tharayo) या वेबसीरिजचा भाग होता. धनुषसहदेखील त्यानं काम केलं होतं. 2019 साली रिलीज झालेल्या एनई नोकी पायुम थोट्टा (Enai Noki Paayum) मध्ये तो धनुषचा सहकलाकार होता.

  काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीनंही केली होती आत्महत्या

  22 जानेवारी, 2021 ला कन्नड Bigg Boss मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री जयश्री रामय्या (jayashree ramaiah) हिनं आत्महत्या केली.  तिनं गेल्या वर्षी जूनमध्येच सोशल मीडियावर आपण आत्महत्या करणार असल्याचं लिहिलं होतं.  24 जून 2020 रोजी या नैराश्यातूनच आपण आत्महत्या करणा असल्याचं तिने Facebook page वर लिहिलं. त्या वेळी कन्नड स्टार किचा सुदीप बंगळुरूच्या संध्या किराना आश्रमात जयश्री रामय्यावर उपचार सुरू होते. पण ती या आजारातून अखेरपर्यंत बाहेर येऊ शकली नाही. ती कुणाचाही फोन उचलत नसल्याचं, मेसेजला उत्तर देत नसल्याचं तिच्या नातेवाईक आणि मित्रांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने ती ज्या आश्रमात उपचार घेत होती, त्यांच्याशी संपर्क साधला. आश्रमाच्या लोकांनी तिच्या खोलीत प्रवेश केला, त्या वेळी ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. बंगळुरूच्या पोलीस ठाण्यात आत्महत्येसंदर्भात नोंद करण्यात आली आहे.

  हे वाचा - रिहानाची FAN आहे कंगना रणौत? 2019 मध्ये केलेलं ट्वीट होतंय VIRAL

  कन्नड Bigg Boss च्या तिसऱ्या सीझनमध्ये जयश्री रामय्या सहभागी झाली होती. तिच्याबरोबरच्या अनेक स्पर्धकांना या रिअॅलिटी शोनंतर कुठे ना कुठे काम मिळालं. पण जयश्री त्या बाबतीत खूश नव्हती. तिला अभिनयाच्या क्षेत्रात योग्य संधी मिळाली नाही आणि त्यातूनच तिला नैराश्य आलं. त्याबद्दल तिने तिच्या मित्रमंडळींंना सांगितलं होतं. कानडी सुपरस्टारने तिला काम मिळवून देऊन मदत करण्याचंही सांगितलं आणि त्या वेळी टोकाच्या नैराश्यातून ती कशीबशी बाहेर पडली. जयश्रीवर मानसोपचार सुरू होते. पण ती नैराश्यातून पूर्ण बाहेर येऊ शकली नाही.

  हे वाचा - त्याच ठिकाणी रिया चक्रवर्ती पुन्हा दिसली; मीडियाला म्हणाली...पाहा VIDEO

  हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यूही अशाच प्रकारे झाला होता. 14 जून 2020 रोजी तो मुंबईत ब्रांद्याच्या त्याच्या फ्लॅटमध्ये फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूसंदर्भात अजूनही चौकशी आणि तपास सुरू आहे.

  First published:

  Tags: Actor, Bollywood News, Suicide