मुंबई, 06 फेब्रुवारी: ट्विटरवर अनेक सेलिब्रिटी त्यांची मतं वेळोवेळी मांडत आली आहेत. मात्र गेल्या वर्षभरात ट्विटरवरील त्यांचं अस्तित्व अशा लोकांनाही माहित झालं आहे जे सोशल मीडियापासून दूर होते. गेल्या वर्षभरात ट्विटर, ट्वीटवॉर, रीट्वीट, कमेंट्स हे शब्द वारंवार अनेकांच्या तोंडी येत आहेत. अभिनेत्री कंगना रणौतच्या बाबतीतही असंच काहीसं झालं, ती आधी सोशल मीडियापासून दूर होती. तिची टीम कंगनाचं सोशल मीडिया अकाउंट सांभाळत असे. पण आता स्वत: कंगना ट्वीट्स करत असते. दर दिवशी ती विविध विषयांवर तिची मतं मांडत असते. दरम्यान काही ट्वीटमुळे तिला मनस्ताप सहन करावा लागतो आहे नक्की. नुकतंच तिने अमेरिकन पॉप स्टार रिहानाबाबत परखड आणि कठोर भाषा असणारं ट्वीट केलं होतं. ज्यावर दोन प्रकारचे मतप्रवाह असणाऱ्या लोकांनी रिप्लाय केला. काहींनी कंगनाला पाठिंबा दिला तर अनेकांनी टीका केली. शेतकरी आंदोलन, बॉलिवूड आणि हॉलिवूड यांची राजकीय सरमिसळ झाल्याचं चित्र यानंतर पाहायला मिळालं. शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत अमेरिकन पॉप स्टार रिहानाने (Rihanna) भाष्य केल्यानंतर कंगना रणौत (kangana Ranaut) तिच्या विरोधात पेटून उठली आहे. दरम्यान आता कंगनाचं आणखी एक जुनं ट्वीट व्हायरल होत आहे. तिने चक्क यामध्ये रिहानाचा उल्लेख करत त्यापुढे हार्ट इमोजी देखील वापरला आहे. त्यामुळे कंगना रिहानाची फॅन असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
Alexa play 'Diamonds' by Rihanna 💘 https://t.co/7rvSAwX66S
— Kangana Ranaut (@KanganaTeam) May 17, 2019
‘Alexa play ‘Diamonds’ by Rihanna’ असं ट्वीट कंगनाने 2019 मध्ये केलं होतं. ते आता फेब्रुवारी 2021 मध्ये पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. काय आहे कंगना-रिहाना वाद? गेल्या काही दिवसांपासून कंगना सतत रिहानावर टिका करताना दिसत आहे. रिपब्लिक टीव्हीला मुलाखतीत कंगनाने रिहानावर थेट हमला करत तिने या एका ट्वीटसाठी किमान 100 करोड रुपये घेतले असतील, असा आरोप केला आहे. रिहानाने आजपर्यंत कोव्हिड-19 विषाणूबाबत एकही ट्वीट केलं नाही. अमेरिकी संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरही तिने एकही शब्द उच्चारला नाही. आणि आज तिने भारतातील शेतकरी आंदोलनावर ट्वीट केलं आहे. त्यामुळे हे ट्वीट पैसे न घेता केलं जाऊ शकत नाही, असा आरोप कंगनाने रिहानावर केला आहे. (हे वाचा- #BlackLivesMatter चा मुद्दा आणत गौहर खानने बॉलिवूडकरांना मारला टोमणा ) रिहानाने भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत (Famer Protest) एक पोस्ट ट्वीट करत लिहिलं होतं की, ‘आपण यावर का बोलत नाही?’ या ट्वीटला उत्तर देताना कंगनाने म्हटलं की, ‘यावर कोणीच बोलत नाहीये, कारण हे शेतकरी नाहीत. ते आतंकवादी आहेत. जे भारताला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण चीन आमच्या कमजोर आणि दुभागलेल्या भारतावर कब्जा करू शकेल.’ यानंतर बॉलीवूडचंही दोन गटात विभाजन झाल्याचं पाहायला मिळालं. रिहानाच्या ट्वीटला काहीजण पाठिंबा देत आहेत, तर काहीजण तिच्यावर टीका करताना दिसत आहेत. अनेक भारतीय सेलिब्रिटींनी यानंतर भारताच्या सार्वभौमत्त्वाबाबत भाष्य करत भारताबाहेरील लोकांनी या प्रकरणात दूर राहाव असा सल्ला दिला आहे.

)







