मुंबई, 06 फेब्रुवारी: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) राजपुतच्या मृत्यूनंतर (Death) अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) बऱ्याच वादात सापडली होती. तिच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. तिला ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) तुरुंगातही जावं लागलं. सीबीआयने सुशांतने आत्महत्या (Suicide) केल्याचं सांगितल्यानंतर रियाभोवती तयार झालेलं संशयाचं वलय कमी होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती मीडियाला आणि फोटोग्राफर्संना टाळण्याचा प्रयत्न करत होती. आता ती तिच्या नॉर्मल आयुष्यात परत येताना दिसत आहे. अलीकडेच रियाला एका जीमच्या खाली पाहिलं होतं. तिने आता तिचा पाठलाग करणाऱ्या फोटोग्राफर्सना उत्तर द्यायला सुरू केली आहेत. तिचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये एक फोटोग्राफरने तिला विचारलं आहे की, ‘रिया मॅम तुम्ही कशा आहात?’ यावेळी रिया म्हणाली की, ‘आता ठीक होत आहे.’ यावेळी रिया चक्रवर्तीला आणि तिचा भाऊ शोविकला एका जीमजवळ स्पॉट करण्यात आलं होतं.
मीडिया रिपोर्टनुसार, रियाला ज्याठिकाणी स्पॉट करण्यात आलं आहे, त्याठिकाणी रिया आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत नेहमी वर्कआउट करण्यासाठी येत असायचे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर, सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा आरोप रिया चक्रवर्तीवर झाला होता. या प्रकरणात रिया मीडिया ट्रायलची शिकार देखील बनली होती. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागत, याचे संबंध ड्रग्जप्रकरणाशी जोडण्यात आले होते. यामुळे रिया आणि तिचा भाऊ शोविक यालाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर ड्रग्ज प्रकरण वाढत जावून यामध्ये दीपिका पादुकोण ते करण जोहर अशा अनेक दिग्गज कलाकारांची नावं समोर आली होती. मीडिया रिपोर्टनुसार, रिया लवकरच बॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ती रुमी जाफरीच्या आगामी चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.

)







