मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Vivek Agnihotri : 'यंदाचा ऑस्कर...' विवेक अग्निहोत्रींचा अनुपम खेर यांच्याबद्दल मोठा दावा

Vivek Agnihotri : 'यंदाचा ऑस्कर...' विवेक अग्निहोत्रींचा अनुपम खेर यांच्याबद्दल मोठा दावा

'द काश्मीर फाइल्स'

'द काश्मीर फाइल्स'

द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाविषयी आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळालं आहे. ही बातमी येताच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं एक ट्विट चर्चेत आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 जानेवारी:  2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी चांगलं ठरलं नसलं तरी काही चित्रपटांना मात्र प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. यापैकीच एक सिनेमा म्हणजे 'द काश्मीर फाइल्स'. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात कायम स्थान निर्माण केलं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. एवढा हिट ठरूनही या चित्रपटाला बॉलिवूडकडून पुरस्कार काही म्हणावे  तेवढे मिळाले नाहीत. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट या वर्षातील सर्वांत वादग्रस्त चित्रपटांपैकी एक ठरला. पण या चित्रपटाविषयी आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळालं आहे. हा बातमी येताच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं एक ट्विट चर्चेत आलं आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स'  या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळालं आहे. नुकतंच विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. अनुपम खेर, मिथुन, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 340 कोटी रुपयांची कमाई केली.  त्यानंतर या चित्रपटाच्या यादीत अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. यातच आता या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत मोठा दावा केला आहे.

हेही वाचा - Oscar 2023: 'द काश्मीर फाइल्स'ची ऑस्करसाठी निवड, या भारतीय सिनेमांचीही नावं शर्यतीत

या ट्विट मध्ये त्यांनी म्हटलंय कि, 'अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार  आणि मिथुन चक्रवर्ती यांची नाव सर्वोत्कृष्ट अभिनेते या यादीत सामील झाली आहेत. त्यामुळे यंदाचा ऑस्कर द काश्मीर फाइल्सलाच मिळणार' असा दावा विवेक अग्निहोत्री यांनी  केला आहे. त्यांचं हे ट्विट आता चर्चेचा विषय ठरतंय. पण यासोबतच त्यांचं चाहत्यांकडून अभिनंदन देखील केलं जात आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब आहे की ऑस्कर 2022 साठी भारतातील चित्रपट  मोठ्या संख्येत निवडले गेले आहेत. यामध्ये एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' व्यतिरिक्त गुजराती चित्रपट 'चेल्लो शो' म्हणजेच 'लास्ट फिल्म शो' आहे. आता याच यादीत  'द काश्मीर फाइल्स' चा देखील समावेश होत आहे.

आपल्या चित्रपटाला ऑस्करमध्ये प्रवेश मिळावा यासाठी राजामौली यांनी खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटाने रिलीज होताच देश-विदेशात चांगलीच खळबळ उडवून दिली होती. तो ऑस्करच्या 'सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म' श्रेणीत नामांकनासाठी पाठवण्यात आला होता, पण काही कारणास्तव तो निवडला गेला नाही. यानंतर, निर्मात्यांनी चित्रपटासंदर्भात मोहीम सुरू केली आणि RRR 14 श्रेणींमध्ये नामांकनासाठी सादर केले गेले. आता याच यादीत  'द काश्मीर फाइल्स', गंगुबाई आणि कांतारा चा देखील समावेश होत आहे.

आता सगळ्या भारतीयांचे डोळे ऑस्करकडे लागले आहेत असं म्हणणं वावगं ठरणार आहे. या सगळ्या  सिनेमांतून कोण ऑस्कर पटकावणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment