मुंबई, 30 डिसेंबर : या वर्षीच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘द कश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत राहतात. विवेक कोणत्याही गोष्टीवर आपले मत व्यक्त करण्यास धजत नाहीत, परंतु कधीकधी असे करणेत्यांच्यावरच उलटते. यावेळीही असेच काहीसे घडले. याआधी विवेक अग्निहोत्रीने शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ या चित्रपटाबाबत असे वक्तव्य केले होते कि लोकांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. आता विवेक यांना टार्गेट करण्यासाठी नेटिझन्स त्यांची मुलगी मल्लिका आणि त्यांच्या जुन्या वादग्रस्त चित्रपटांचे व्हिडिओ वापरत त्यांना ट्रोल करत आहेत. विवेक अग्निहोत्रीने अलीकडेच शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याच्या माध्यमातून बॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या अश्लीलतेवर निशाणा साधला होता. विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्यांनी बॉलिवूड चित्रपटांतून दाखवल्या जाणाऱ्या अश्लीलतेवर ताशेरे ओढले. त्या क्लिपमध्ये एक किशोरवयीन मुलगी गाण्याचे आताच्या पीढीवर होत असलेल्या परिणामांवर चिंता व्यक्त करताना दिसत आहे. या ट्वीटनंतर सोशल मीडियावर त्यांच्याविरुद्ध ट्रोलिंग सुरू झालं आहे. हेही वाचा - शिझानने तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला…; तुनिषाच्या आईच्या दाव्याने खळबळ विवेक अग्निहोत्रीच्या या ट्विटवर सोशल मीडिया यूजर्सचा भडका उडाला असून ते वेगवेगळ्या पद्धतीने दिग्दर्शकावर निशाणा साधत आहेत. विवेक अग्निहोत्रीच्या मुलीचे भगव्या रंगाची बिकिनी घातलेले फोटो काही यूजर्सने व्हायरल केले आहेत, तर काहीजण तिच्या वादग्रस्त चित्रपटांचे व्हिडिओ व्हायरल करून त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये, विवेक अग्निहोत्रीची मुलगी मल्लिका भगव्या रंगाची बिकिनी परिधान करून समुद्रकिनाऱ्यावर पहुडलेली दिसत आहे.
एका यूजरने विवेक अग्निहोत्रीच्या मुलीचे बिकिनी फोटो शेअर करत लिहिले की, ‘विवेक अग्निहोत्रीला हिरोइन्सच्या बिकिनी पिक्चर्सची अडचण आहे आणि इथे पाहा त्यांच्या मुलीचे स्वतःचे बिकिनी फोटो.’ हे फोटो व्हायरल होताच मल्लिकाने तिचे अकाउंट प्रायव्हेट केले आहे. सोशल मीडियावर ही मुलगी विवेक अग्निहोत्री यांचीच मुलगी असल्याचा काही लोक दावा करत आहेत आणि फोटो शेअर करत आहेत. मल्लिकाचे सोशल मीडिया अकाऊंट प्रायव्हेट असलं तरी तिला पल्लवी जोशी फॉलो करत असल्याचंही स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हे फोटो विवेक अग्निहोत्री यांच्या मुलीचेच असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वडिलांचे विधान आणि मुलीचे त्याच्या विपरीत फोटो शेअर करून सोशल मीडियावर विवेक यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे. याबद्दल विवेक किंवा पल्लवी यांपैकी कुणीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. हे फोटो नेमके तीचेच आहेत की नाहीत याची पुष्टी अजून कुणीच दिलेली नाही, पण एकंदरच सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्री यांना यावरून प्रचंड ट्रोल केलं जात आहे.आता या सगळ्या प्रकरणावरविवेक अग्निहोत्री काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.