जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Oscar 2023: 'द काश्मीर फाइल्स'ची ऑस्करसाठी निवड, या भारतीय सिनेमांचीही नावं शर्यतीत

Oscar 2023: 'द काश्मीर फाइल्स'ची ऑस्करसाठी निवड, या भारतीय सिनेमांचीही नावं शर्यतीत

द काश्मीर फाइल्स

द काश्मीर फाइल्स

RRR नंतर आता काश्मीर फाईल्स देखील ऑक्सरच्या शर्यतीत सामील झाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 जानेवारी: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट या वर्षातील (2022) सर्वांत वादग्रस्त चित्रपटांपैकी एक आहे. अनुपम खेर, मिथुन, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 340 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपट रिलीज होऊन आठ महिने उलटले असले तरीही हा चित्रपट काहीना काही कारणास्तव चर्चेत येत आहे.  यावेळी हा चित्रपट चर्चेत येण्याचं कारण कौतुकास्पद आहे. यापूर्वी ऑस्कर या सर्वोच्च पुरस्कारासाठी भारतातून RRR या चित्रपटाची निवड झाली होती. आता या यादीत  ‘द काश्मीर फाइल्स’ ने देखील स्थान पटकावलं आहे. नुकतंच  ‘द अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ ने ऑस्कर 2023 ‘सर्वोत्कृष्ट चित्र’ नामांकन विचारात घेण्यासाठी पात्र असलेल्या जगभरातील 276 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. यावेळी , ‘द अकादमी’ ने सांगितले आहे की ही संख्या 301 चित्रपटांपर्यंत वाढवली गेली आहे आणि यात  द काश्मीर फाइल्स या चित्रपटाचा देखील समावेश केला आहे. हेही वाचा - Pathaan Trailer Out: एकीकडे पठाणचा वाद दुसरीकडे ट्रेलरचा धमाका; रिलीज होताच अवघ्या वीस मिनिटांतच नवा रेकॉर्ड यासोबतच भारतातून गंगूबाई काठियावाडी, कांतारा  आणि इराविन निझाल सारख्या भारतातील ब्लॉकबस्टर चित्रपट देखील RRR आणि द लास्ट फिल्म शो सोबत समावेश करण्यात आला आहे.

जाहिरात

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब आहे की ऑस्कर 2022 साठी भारतातील चित्रपट  मोठ्या संख्येत निवडले गेले आहेत. यामध्ये एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ व्यतिरिक्त गुजराती चित्रपट ‘चेल्लो शो’ म्हणजेच ‘लास्ट फिल्म शो’ आहे. आपल्या चित्रपटाला ऑस्करमध्ये प्रवेश मिळावा यासाठी राजामौली यांनी खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटाने रिलीज होताच देश-विदेशात चांगलीच खळबळ उडवून दिली होती. तो ऑस्करच्या ‘सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म’ श्रेणीत नामांकनासाठी पाठवण्यात आला होता, पण काही कारणास्तव तो निवडला गेला नाही. यानंतर, निर्मात्यांनी चित्रपटासंदर्भात मोहीम सुरू केली आणि RRR 14 श्रेणींमध्ये नामांकनासाठी सादर केले गेले. आता याच यादीत  ‘द काश्मीर फाइल्स’ चा देखील समावेश होत आहे. तर  ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला यंदाचा ऑस्कर मिळेल’ असा मोठा दावा  विवेक अग्निहोत्रींनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात