मुंबई, 25 मार्च : ‘बिग बॉस 16’ चा विजेता एमसी स्टॅन सध्या खूपच चर्चेत आहे. बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर तो खूपच लोकप्रिय झाला. त्याच्या चाहत्यावर्गातही तुफान वाढ झाली. सध्या एमसी स्टॅन देशभरात विविध ठिकाणी कॉन्सर्ट करतो आहे. मध्यंतरी त्याच्या कॉन्सर्टमध्ये खूप गोंधळ देखील झाला. पण सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे एमसी स्टॅन चं आणि अब्दू रोजीकचं भांडण. अब्दुने काही दिवसांपूर्वी मंडळी तुटल्याचा दावा केला होता. एमसी स्टॅनमुळेच हे घडल्याची चर्चा होती. आता या सगळ्यावर एमसी स्टॅनने स्पष्टीकरण दिलं आहे. बिग बॉस 16 चा विजेता आणि रॅपर एमसी स्टॅन आणि सर्वांचा लाडका ‘छोटा भाईजान’ अब्दु रोजिक यांच्यात सध्या काही अलबेल नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील भांडणाच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. बिग बॉस 16 मध्ये हे दोघे चांगले मित्र होते. तिथून बाहेर येताच दोघेही एकमेकांच्या विरोधात गेले आहेत. यापूर्वी अब्दूच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करत त्यांच्यातील भांडणाचे कारण देखील सांगितलं होतं. अब्दूने स्टॅनच्या आईसोबत फोटो काढण्यास नकार दिला तेव्हापासून यांच्यात भांडण सुरु झालं असं बोललं जातं. आता स्टॅनच्या टीमकडूनही एक निवेदन जारी करण्यात आले आहे. सोनाली बेंद्रेच्या प्रेमात होता पाकिस्तानी क्रिकेटर; वॉलेटमध्ये ठेवायचा फोटो, म्हणालेला ‘तिने नकार दिल्यावर…’ अब्दू रोजिकच्या टीमने जारी केलेल्या निवेदनात असे लिहिले आहे की, दोघे नुकतेच बेंगळुरूमध्ये भेटले होते. तिथे अब्दूला स्टॅनच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी व्हायचं होतं आणि त्याला पाठिंबा द्यायचा होता. पण स्टॅनच्या सुरक्षा पथकाने आणि आयोजकांनी त्याला तसं करण्यास नकार दिला. स्टॅनच्या टीमकडून ही चूक झाल्याचं अब्दूला वाटलं म्हणून त्याने तिकीट काढून सामान्य पाहुण्याप्रमाणे तिथे जाण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र यानंतर स्टॅनच्या व्यवस्थापकाने अब्दूला शिवीगाळ करत एंट्री गेटवरूनच परत पाठवलं. एवढेच नाही तर त्याया गाडीचीही तोडफोड करण्यात आली असून फलकही फोडण्यात आल्याचे निवेदनात लिहिले आहे.
इतकंच नव्हे तर अब्दुने स्टॅनच्या आईबरोबर फोटो न काढल्याने तो नाराज असल्याचं मंडलीमधील इतर सदस्यांनी सांगितलं होतं. आता एमसीच्या टीमने याबाबत भाष्य केलं आहे. एमसीच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं की, “‘बिग बॉस’ संपल्यानंतर एमसी त्याच्या टूरमध्ये व्यग्र झाला आहे. तो एक स्वतंत्र्य कलाकार आहे. त्याने नेहमीच एकट्याने परफॉर्म केलं आहे”.
‘एमसी कोणाबरोबरच एकत्रित परफॉर्म करू इच्छित नाही. बंगळुर कॉन्सर्टदरम्यान अब्दूचा अपमान करणं, तसेच त्याच्या कारचं पॅनल तोडणं या सगळ्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. कोण असं का करेल? हे सगळे आरोप खोटे आहेत.’ असं एमसी स्टॅन म्हणाला आहे. आता या सगळ्या प्रकरणावर पुढे अब्दु काही बोलणार का हे पाहावं लागेल. या दोघांच्या भांडणामुळे बिग बॉसची मंडळी कायमची तुटणार का याचं चाहत्यांना दुःख आहे.