मुंबई, 25 मार्च : 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. ती सध्या ‘इंडिया बेस्ट डान्सर 3’ या रिअॅलिटी शोसाठी प्रसिद्धीच्या झोतात आहे, ज्यामध्ये ती टेरेन्स लुईस आणि गीता कपूर यांच्यासोबत जज म्हणून दिसणार आहे. सोनालीला मध्यंतरी कॅन्सरने गाठले होते पण त्याच्यावर तिने यशस्वी मात केली. या अभिनेत्रीनं अनेकांना प्रेरणा दिली आहे. सोनाली बेंद्रेने ‘दिलजले’, ‘सरफरोश’, ‘मेजर साब’ यांसारख्या चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका साकारून लाखो प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. तिचे चाहते केवळ देशातच नाही तर परदेशातही आहेत. एकेकाळी पाकिस्तानचा एक प्रसिद्ध क्रिकेटर सोनाली बेंद्रेच्या प्रेमात होता. काय होता तो किस्सा जाणून घ्या… सोनाली बेंद्रे खूप हुशार आणि सुंदरही आहे. ९० च्या दशकात माधुरी दीक्षित, जुही चावला आणि श्रीदेवी यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या उपस्थितीत तिने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली. 1995 मध्ये ‘आग’ चित्रपटातून या अभिनेत्रीने पदार्पण केले तेव्हा शेजारच्या देशातही तिच्या सौंदर्याच्या चर्चा सुरू झाल्या. तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरने जेव्हा सोनालीला पाहिले तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला होता. आमिर-अजयसोबत रोमान्स, अनेक पुरस्कार जिंकले; बॉलीवूड सोडून आता ब्रम्हकुमारी बनुन आयुष्य जगतेय ‘ही’ अभिनेत्री मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोएब अख्तरला सोनाली इतका आवडायची कि तो तिचा फोटो त्याच्या वोलेटमध्ये ठेवायचा. त्याने एकदा सोनाली बेंद्रेला प्रपोज करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. एवढंच नाही तर, जर अभिनेत्रीने त्याला नकार दिला तर तो तिचे अपहरण करेल असं देखील तो मजेत म्हणाला होता. सोनालीचे खूप चाहते आहेत. सुनील शेट्टीलाही ती खूप आवडायची असे म्हंटले जाते. पण ते दोघे चांगले मित्र होते, पण नशिबाने एकत्र आणले नाही.
सोनाली बेंद्रे हिने 12 नोव्हेंबर 2002 रोजी गोल्डी बहलशी लग्न केले, त्यांना एक मूलगा आहे. सोनालीला 2018 मध्ये मेटास्टॅटिक कर्करोगाचे निदान झाले होते, ज्यासाठी तिने यूएसमध्ये उपचार घेतले होते. कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर ती आनंदी जीवन जगत आहे.
सोनालीने गेल्या वर्षी ‘द ब्रोकन न्यूज’ या वेब सीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण केले. ती बऱ्याच काळापासून रिअॅलिटी शोजची जजही करत आहे. त्याने ‘इंडियन आयडॉल’, ‘इंडिया गॉट टॅलेंट’ आणि ‘इंडिया बेस्ट ड्रामेबाज’ सारख्या शोजचे जज केले आहेत. ती आता ‘इंडिया बेस्ट डान्सर 3’ या शोला जज करताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा रिअॅलिटी शो 8 एप्रिल 2023 पासून सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे.