मुंबई, 31 डिसेंबर : 2022 या वर्षात मोठमोठ्या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना आकर्षित करण्यात सपशेल अपयशी ठरले. या चित्रपटांमध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती आमिर खान च्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाची. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी झाला आहे. या चित्रपटातून आमिर खान तब्बल चार वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकला. आमिर खानचा चित्रपट असल्याने तो बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करेल अश्या आशा चित्रपटाचे निर्माते, कलाकार आणि दिग्दर्शकांना होत्या. मात्र या चित्रपटाने सगळ्यांचीच निराशा झाली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच अपयशी ठरला. परंतु आता रिलीजनंतर एवढ्या दिवसांनी पुन्हा एकदा ‘लाल सिंह चढ्ढा’ चर्चेत आला आहे. काय आहे त्यामागचं कारण जाणून घ्या. एकीकडे सोशल मीडियावर आणि चित्रपटगृहात ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी बॉयकॉट केलं असताना दुसरीकडे मात्र हा चित्रपट रिलीजनंतर एवढ्या दिवसांनी पुन्हा एकदा ट्विटरवर ट्रेंड होत आहे. ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट OTT आणि टेलिव्हिजन वर रिलीज झाला. त्यानंतर या चित्रपटाने मात्रप्रेक्षकांचे दुप्पट प्रेम जिंकले आहे. हेही वाचा - Madhurani Prabhulkar: अरुंधतीच्या गालावर ती जखम कसली? अखेर मधुराणीने चाहत्यांसमोर केला मोठा खुलासा आमिर खान आणि करीना कपूर खान स्टारर या चित्रपटाला ओटीटी आणि छोट्या पडद्यावरील कौटुंबिक प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले आहे. याचाच परिणाम म्हणून हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर #RediscoveringLSC म्हणजेच या हॅशटॅगसोबत ट्रेंड करत आहे. काहींनी लाल सिंग चड्ढा यांना ‘भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक’ म्हणून संबोधले, तर काहींनी त्यांच्या घरीच हा चित्रपट पहिला आहे. तसेच या चित्रपटाला नवा प्रेक्षक वर्ग मिळाला असल्याचे बोलले जात आहे. याआधी ट्वीटवरवरून अनेकजण या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत.
या प्रतिक्रिया पाहता, प्रेक्षक आमिर खानच्या लाल सिंग चड्ढाच्या पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत असे म्हणणे योग्य ठरेल. नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर ‘लाल सिंह चड्ढा’ सुमारे 6.63 दशलक्ष तास पाहिला गेला आणि सोशल मीडियावर वापरकर्त्यांकडून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. OTT वर रिलीज झाल्याच्या आठवड्यात, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर भारतात पहिल्या क्रमांकावर होता आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर होता.
अलीकडेच आमिर खानने ‘तो काही काळ अभिनयातून ब्रेक घेत आहे’ अशी घोषणा केली होती. त्याने त्याच्या आगामी ‘चॅम्पियन्स’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून आपलं नावही वेगळं केलं आहे. आणि आता केवळ निर्माता म्हणून त्या चित्रपटाशी जोडला गेला आहे. आता ‘लाल सिंह चड्ढा’ ला मिळणारं लोकांचं प्रेम ही आमिर खांसाठी चांगली बातमी आहे.