मुंबई, 31 डिसेंबर : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील सर्व कलाकारही घराघरांत पोहचले असून सतत चर्चेत असतात. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील मुख्य चेहरा म्हणजे अरुंधती. मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर तिच्या अभिनयामुळे तर चर्चेत असतेच मात्र ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रकाश झोतात असते. मागच्या काही काळात मालिकेतील अरुंधतीच्या चेहऱ्यावर काही बदल दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर तो खड्डा अचानक कसा आला याबद्दल चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न होते. आता अखेर अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ने समोर येत त्याबद्दल खुलासा केला आहे. अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सोशल मीडियाद्वारे अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत असते. सध्या ती मालिकेतून ब्रेक घेत लेकीबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मधुराणीने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड करत तिच्या चेहऱ्यावरील ही जखम नेमकी कसली यावर आता तिने स्वतः उत्तर दिले आहे. यामध्ये मधुराणीने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तिने आपण मालिकेतून ब्रेक का घेतला होता? आपल्या गालावर जखम कसली आहे? आणि नेमकं काय झालंय हे सांगितलं आहे. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte:अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवं वादळ; आशुतोष अनुष्काच एकमेकांना देणार प्रेमाची कबुली? मधुराणीने एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हणाली, ‘‘नमस्कार, आज मला तुम्हा सगळ्यांसोबत बोलायचंय माझ्या या जखमेबद्दल आणि गालावरच्या सिस्टबद्दल. दीड वर्षांपूर्वी माझ्या गालावर अचानक एक उंचवटा दिसायला लागला. नंतर मला कळलं की याला सीबीशीएस्ट सिस्ट म्हणतात. दीड वर्षांपूर्वी त्याचं ऑपरेशन झालं पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर इस्पितळात आणि तुम्हाला आठवत असेल जून जुलै महिन्यात मी काही एपिसोड पट्टी लावूनही केले.’’
‘‘मला या जखमेचे आभार मानायचेत कारण तिने मला खूप काही शिकवलं. मला आठवतंय की पट्टी लावून एपिसोड केले तेव्हा क्लायमॅक्स आला होता सिरीयलचा तरीही प्रेक्षकांनी अरुंधतीवर भरभरून प्रेम केलं. तिथेच मला या जखमेने स्वतःला स्विकारायला शिकवलं. माझ्यासाठी हा खूप मोठा धडा होता.’’
‘मी आज माझ्या उजव्या गालावरच्या जखमेविषयी बोलणार आहे. गेल्या वर्षात तिने मला खूप शिकवलंय. स्वतःकडे आणि आयुष्याकडे बघायचा वेगळा दृष्टीकोण दिलाय. कदाचित तुम्हालाही यातून काही हाती लागलं तर नक्की सांगा. नवीन वर्षाच्या खूप खूप खूप शुभेच्छा…!!!!’, असं म्हणत मधुराणी प्रभुलकरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहते कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत.