त्यानंतर आता 'लाल सिंह चढ्ढा'चे दिग्दर्शक अद्वैत चंदनने आमिर खानची पूजा करतानाचे काही फोटो आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत.
हिंदू पद्धतीप्रमाणे आमीर खान यानं विधीवत पुजा केली. यावेळी त्याने डोक्यावर नेहरु टोपी देखील घातल्याचं पाहायला मिळालं.
कलश पूजेदरम्यान त्याची माजी पत्नी किरण रावही आमिरसोबत दिसली. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेले हे फोटो पाहून चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात.
आमीर खान आणि किरण राव हे एकमेकांपासून वेगळे झाले असले, तरी कामाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा सोबत आल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
आता हे दोघे वेगळे झाले असून पुन्हा पुन्हा एकत्र पाहिल्यावर चाहत्यांना प्रश्न पडले आहेत. यामुळे तो ट्रोल देखील होत आहे.
आमिर खानच्या कलश पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासोबतच आमिर काही नवीन सुरुवात करणार आहे का, याची उत्सुकताही लोकांमध्ये वाढली आहे.