जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Aai Kuthe Kay Karte: गौरी निघून गेल्यावर वाईट झालीये यशची अवस्था; खचलेल्या लेकाला कसं बाहेर काढणार आई?

Aai Kuthe Kay Karte: गौरी निघून गेल्यावर वाईट झालीये यशची अवस्था; खचलेल्या लेकाला कसं बाहेर काढणार आई?

आई कुठे काय करते

आई कुठे काय करते

अरुंधतीचं दुसरं लग्न झालं असलं तरी तिच्या लेकाचं लग्न मात्र मोडलं आहे. गौरीने यशसोबतचं नातं कायमच तोडलं आहे. आता मालिकेच्या पुढच्या भागाची अपडेट समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,29 मार्च:  आई कुठे काय करते या मालिकेची सध्या प्रचंड चर्चा आहे. मालिकेत सुरु असलेल्या कथानकामुळं सध्या सगळ्यांचंच लक्ष मालिकेवर वेधलं आहे. मालिकेत आई अरुंधतीचं  दुसरं लग्न मुलांसहित सासू सासऱ्यांनी धुमधडाक्यात लावून दिलं. अरुंधतीच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली आहे. आशुतोशसोबत अरुंधतीचा सुखी संसार सुरु झाला आहे. पण असं असलं तरी दुसरीकडे मात्र तिच्या आयुष्यातील संकटं मात्र संपता संपत नाहीयेत. आता अरुंधतीचं दुसरं लग्न झालं असलं तरी तिच्या लेकाचं लग्न मात्र मोडलं आहे. गौरीने यशसोबतचं नातं  कायमच तोडलं आहे. आता मालिकेच्या पुढच्या भागाची अपडेट समोर आली आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं नवं कथानक सध्या चांगलच पसंत केलं जात आहे. मालिकेत आता अरुंधती आणि आशुतोषचं लग्नानंतरचं आयुष्य सुरु झालं आहे. या दोघांमध्ये आता प्रेमळ नात्याची सुरुवात झाली आहे. पण आता मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यावरून अरुंधती समोर एक नवं आव्हान उभं राहील आहे. अरुंधतीच्या लग्नाला यशने सगळ्यात जास्त पाठींबा दिला. पण त्याच्या आयुष्यातील प्रेम मात्र त्याच्यापासून दुरावणार आहे. गौरीने यशसोबत ठरलेलं लग्न मोडलं. आणि तिने कायमचं अमेरिकेला जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता त्यानंतर यशची अवस्था मात्र वाईट झाली आहे. Parineeti Chopra : राघव चड्ढांचं नाव घेताच परिणितीने दिली अशी रिऍक्शन; अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत आई कुठे काय करते मालिकेचा नवीन एपिसोड अपडेट समोर आला आहे.  यामध्ये गौरीबद्दल समजताच अरुंधती यशला भेटायला देशमुखांच्या घरी येते. सगळे यशला समजावून सांगत असतात. अनिरुद्ध मात्र गौरीला दोष देत असतो. तो म्हणतो, ‘बरं झालं गौरी निघून गेली, अशी मुलगी नकोच होती आमच्या घरात.’ पण अनिरुद्धचं हे बोलणं ऐकून संजना त्याच्यावर भडकते. ती म्हणते, ‘गौरी काही वाईट मुलगी नाहीये. तिने जो निर्णय घेतला तो तिच्या आयुष्यासाठी योग्यचं होता.’ दोघांचं बोलणं ऐकून यश चिडून तिथून निघून जातो. पण त्यानंतर अनिरुद्ध मात्र असं घडल्याचं सगळं खापर अरुंधतीवर फोडतो. तो म्हणतो ‘बोलवा अजून बाहेरच्या लोकांना, असंच होणार आता इथूनपुढे.’

जाहिरात

मालिकेत आलेल्या नव्या ट्विस्टमुळे अरुंधतीसमोर पुन्हा नवं आव्हान उभं राहील आहे. आता या सगळ्यातून अरुंधती यशला कसं बाहेर काढते ते पाहणं महत्वाचं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

‘आई कुठे काय करते’ ही आईच्या विश्वाभोवती फिरणारी ही मालिका प्रेक्षकांसाठी रोजच्या आयुष्यातील एक भाग बनली आहे. या मालिकेतील आशुतोष आणि अरुंधतीच्या लग्नाचा ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडला. त्यामुळेच मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. आता लग्नानंतर अरुंधतीचं आयुष्य कसं बदलणार, तिच्या आयुष्यात पुढे काय घडणार हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात