मुंबई,29 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा सध्या रंगात आहे. परिणीती कोणी अभिनेता नाही तर एका राजकीय नेत्याच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. परिणीती आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यात काहीतरी शिजतंय आणि ते लवकरच लग्न करणार आहेत असं बोललं जातंय. एवढंच नाही तर कालच एका आपच्या नेत्याने या दोघांविषयी ट्विट करत यांच्या नात्यावर शिक्कामोर्तबच केलं आहे. पण त्यावर या दोघांनी अजूनही मौन बाळगलं आहे. मध्यंतरी राघव यांना परिणीती बद्दल विचारलं असता त्यांनी मजेदार उत्तर दिलं होतं. आता त्यानंतर परिणितीने हाच प्रश्न विचारताच दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
परिणीती आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यात नेमकं काय चाललंय, याची देशभर चर्चा होत आहे. हे दोघे अनेकदा एकत्र स्पॉट होतात. त्यामुळेच हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी परिणिती आणि आपचे खासदार राघव चड्ढा मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर डिनरला जाताना स्पॉट झाले होते, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ते लंचसाठी जाताना दिसले. एकाच गाडीतून दोघेही एकत्र या लंच आणि डिनर डेटसाठी जाताना स्पॉट झाले आणि त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या. पण दोघेही त्यांच्या नात्याबद्दल काहीही बोलणे टाळत आहेत. नुकतीच परी विमानतळावर स्पॉट झाली. राघवसोबतच्या लग्नाबद्दल विचारल्यावर परिणीती चोप्राने हसून दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
'ये दिल आशिकाना' फेम करण नाथचं माधुरीसोबत खास कनेक्शन; एका हिट नंतर कुठे गायब झाला अभिनेता?
बुधवारी एका पापाराझी अकाऊंटने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये परिणीती विमानतळाबाहेर पडताना दिसत आहे. अभिनेत्रीसमोर काही पापाराझीनी राघव चड्ढा यांचं नाव घेताच परिणीती गालातल्या गालात लाजत आणि हसत गाडीमध्ये जाऊन बसली. यावेळी अनेक फोटोग्राफर्सनी तिला विचारले की लग्नाच्या अफवा खऱ्या आहेत का? तिच्या कारकडे जात असताना, परिणिती आधी हसली आणि नंतर गालातल्या गालात लाजली. तिची ही प्रतिक्रिया बरंच काही सांगून गेली.
View this post on Instagram
मंगळवारी आपचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांनी राघव आणि परिणिती चोप्रा यांचे अभिनंदन करत एक ट्विट केले होते. खासदार संजीव अरोरा यांनी म्हटलंय, "परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या एकत्र येण्यात प्रेम, आनंद आणि सहवास लाभो. दोघांनाही माझ्या शुभेच्छा". तेव्हापासून या दोघांच्या लग्नाविषयी चर्चा अधिक रंगल्या. पण मध्यंतरी राघव चड्ढा यांना मुलाखतीत याविषयी विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी, "मला राजनीती विषयी प्रश्न विचारा परिणीती विषयी नको", असं उत्तर दिलं होतं.
परिणीती आणि राघव चड्ढा या दोघांची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती असं सांगितलं जातं. दोघेही यूकेमध्ये शिकत असल्यापासून एकमेकांना ओळखत होते. रिपोर्ट्सनुसार, परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले आहे. परिणीती आणि राघव दोघेही जानेवारीत लंडनमध्ये झालेल्या पहिल्या इंडिया यूके आऊटस्टँडिंग अचिव्हर्स अवॉर्ड्समध्ये सहभागी झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.