मुंबई, 07 एप्रिल: आई कुठे काय करते या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. एकीकडे अरुंधती आणि आशुतोष नवीन संसाराला सुरुवात करत आहेत तर दुसरीकडे ईशा आणि अनिषमुळे मालिकेला पुन्हा वेगळं वळण लागलं आहे. अनिष म्हणजेच आशुतोषचा पुतण्या आणि अरुंधतीची मुलगी ईशा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. त्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचं आहे. पण त्यांच्या लग्नाला अनिरुद्धचा विरोध आहे. त्यामुळेच ईशाला अनिषसोबत पळून जाऊन लग्न करायचं आहे. पण सगळ्यांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन लग्न करण्याला अनिशचा नकार आहे. आता या सगळ्यानंतर अरुंधतीने आपल्या लेकीविषयी मोठा निर्णय घेतला आहे. आई कुठे काय करते मालिकेच्या आगामी भागाचा एपिसोड अपडेट समोर आला आहे. त्यामध्ये ईशा आणि अनिषच्या नात्याला अनिरुद्ध विरोध करत आहे. तो ईशाला समजवण्याचा प्रयत्न करतो. तसंच ईशाने अनिषला कायमचं विसरून जावं, दोघांचं नातं तुटावं म्हणून तो ईशाला परदेशात शिकायला पाठवण्याचा निर्णय घेतो. हा निर्णय ऐकून घरच्यासहित अरुंधतीला देखील चांगलाच धक्का बसतो. तिला ईशासाठी अनिश योग्य मुलगा आहे असं वाटत असतं. ती ईशा आणि अनिषविषयी घरच्यांना समजावणार असते. पण एवढ्यात तिला ईशा आणि अनिष घर सोडून गेल्याचं कळतं. दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. Akanksha Dubey: आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; गायक समर सिंगला अटक मालिकेच्या नवीन प्रोमो नुसार, दोघे पळून गेल्याने सगळ्यांनाच त्यांची काळजी सतावते. पण अनिष ईशापासून लपून दोघे नक्की कुठे आहेत याविषयी सांगतो. या दोघांना शोधत अरुंधतीसह घरातील सगळेच तिथे येतात. ईशाच्या पळून जाऊन लग्न करण्याच्या निर्णयामुळे संतापत अरुंधती सगळ्यांसमोरच तिच्या कानाखाली लगावते. आता सगळे घरी येतात तेव्हा अरुंधती सगळ्यांसमोर तिचा मोठा निर्णय सुनावते.
ईशा आणि अनिषबद्दल बोलताना अरुंधती सगळ्यांना म्हणते, ‘ते दोघे प्रेम करतात एकमेकांवर. अनिष सुद्धा चांगला मुलगा आहे. सध्या लग्न नाही तरी दोघांचा साखरपुडा करून घेऊया आपण.’ अरुंधतीचं हे बोलणं ऐकून अनिरुद्ध चांगलाच संतापतो. आता ईशा आणि अनिष च्या लग्नावर देशमुख कुटुंबीय काय प्रतिक्रिया देणार, अनिरुद्ध या दोघांचं लग्न होऊ देणार का, हे दोघे पुढे कोणतं पाऊल उचलणार हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेचं नवं कथानक सध्या चांगलच पसंत केलं जात आहे. मालिकेत आता अरुंधती आणि आशुतोषचं लग्नानंतरचं आयुष्य सुरु झालं आहे. या दोघांमध्ये आता प्रेमळ नात्याची सुरुवात झाली आहे. पण मालिकेत आलेल्या नव्या ट्विस्टमुळे अरुंधतीसमोर पुन्हा नवं आव्हान उभं राहील आहे. या सगळ्याला अरुंधती कशी सामोरं जाणार, आशुतोष तिला या सगळ्यात साथ देणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.