जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Akanksha Dubey: आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; गायक समर सिंगला अटक

Akanksha Dubey: आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; गायक समर सिंगला अटक

आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणात गायक समर सिंगला अटक

आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणात गायक समर सिंगला अटक

Akanksha Dubey Death Case: आकांक्षा दुबेने अवघ्या २५ वर्षी मोठं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं होतं.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 7 एप्रिल- भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने 26 मार्च 2023 रोजी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं होतं. अभिनेत्रीने उचललेल्या या टोकाच्या पावलाने सर्वांनाच धक्का बसला होता. ही 25 वर्षीय अभिनेत्री वाराणसीमधील एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आली होती. आकांक्षा ‘लायक हूं मैं नालायक नही’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिथे गेली होती. दरम्यान ती एका हॉटलेमध्ये थांबली होती. अभिनेत्रींच्या मृत्यूनांतर या हॉटेलच्या खोलीत कोणतीही सुसाइड नोट सापडली नव्हती. परंतु अभिनेत्रीची हत्या झाल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. या प्रकरणात अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड अभिनेता-गायक समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांच्यावर हे आरोप लावण्यात आले होते. हे दोन्ही भाऊ गेल्या 11 दिवसांपासून फरार होते. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, या दोघांना अटक करण्यात आली आहे. गाजियाबाद पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. (हे वाचा: एका अपघाताने उध्वस्थ झालं गब्बरचं आयुष्य; शेवटी अशी झालेली अमजद खान यांची अवस्था ) अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आईने समर सिंगवर अभिनेत्रीला आपलं आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर समर आणि त्याचा भाऊ फरार होता. आकांक्षाच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीत समर सिंहचा भाऊ संजय सिंह याचंही नाव आरोपी म्हणून आहे. या दोघांविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, समर सिंग विदेशी पळ काढण्याच्या तयारीत होता. परंतु जेव्हा पोलिसांना या गोष्टीची भनक लागली, तेव्हा त्यांनी सर्व एयर्पोर्टसवर शोध सुरु केला होता. सारनाथ पोलिस ठाण्याचे एसएचओ धर्मपाल सिंह यांनी सांगितलं की, समर आणि त्याच्या भावाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि इतर संबंधित कलमांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आकांक्षाच्या आईच्या तक्रारीच्या आधारे ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात