मुंबई, 04 फेब्रुवारी : आई कुठे काय करते मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. सध्या मालिकेत अरुंधतीच्या लग्नाची गडबड पाहायला मिळतेय. आशुतोषला तिने होकार कळवल्यावर दोन्ही घरी लग्नाची लगबग चालू झाली आहे. अरुंधतीला साधेपणानं लग्न करायचंय तर आशुतोषच्या घरच्यांना धुमधडाक्यात लग्न करायचं आहे. आता त्याविषयीचं मालिकेचं कथानक आहे. पण अरुंधतीच्या लग्नाला अनिरुद्ध आणि देशमुख कुटुंबीयांचा विरोध पाहायला मिळतोय. आता त्याबद्दलच एपिसोड अपडेट समोर आला आहे.
अरुंधतीने अखेर काहीही झालं तरी आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अप्पा, यश, अनघा आणि संजनाचा अरुंधतीच्या लग्नाला पाठींबा आहे. पण कांचन आणि अनिरुद्धला अरुंधतीने दुसरं लग्न करणं मान्य नाही. अशातच अरुंधतीने सगळ्यांच्या विरोधात जाऊन घर सोडलं आहे. तर कांचनने अरुंधतीने लग्न केलं तर तिला पुन्हा देशमुख कुटुंबियांच्या घरात स्थान नाही असा निर्णय सुनावला आहे. त्यातच आता अरुंधतीच्या लग्नाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार, अरुंधती घर सोडून गेलीये, पण अप्पाना तिने देशमुखांच्या घरातूनच सासरी जावं असं वाटत आहे. त्यामुळे ते तिला म्हणतात कि, 'अरु मला तुझी पाठवणी माझ्या घरून करायची आहे. मी तुझं कन्यादान करणार आहे.' अप्पांचा हा निर्णय ऐकून अनिरुद्ध चांगलाच चिडतो. तो घरातल्या सगळ्यांना म्हणतो कि, 'अरुंधती लग्नाआधी या घरात राहायला आली तर मी इथून निघून जाईन.' पण अप्पा त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. ते म्हणतात, 'ज्यांना माझा निर्णय मान्य नसेल त्यांनी हवं ते करावं.'
View this post on Instagram
अप्पांच्या या निर्णयामुळे अनिरुद्ध चांगलाच चिडला आहे त्यामुळं तो काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे. तसेच अरुंधती आणि आशुतोषचं लग्न सुरळीतपणे पार पडेल कि काही विघ्न येईल हे पाहण्याची सुद्धा प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
पण त्याआधी तिच्या लग्नात पुन्हा विघ्न येण्याची शक्यता आहे. कारण अप्पा लग्नाची तारीख काढायला गेलेले असतात. पण त्यातही ते म्हणतात कि एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे.' आता तो प्रॉब्लेम नक्की काय हे बघणं महत्वाचं आहे. 'आई कुठे काय करते' ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत.ही मालिका आई अर्थातच अरुंधतीभोवती फिरत असली तरी मालिकेतील प्रत्येक पात्र तितकीच महत्वाची आहे. आता मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.