मुंबई, 13 जानेवारी: ‘ आई कुठे काय करते ’ मालिकेच्या कथानकात येणाऱ्या ट्विस्टमुळे दिवसेंदिवस मालिका रंजक होत आहे. एकीकडे देशमुख कुटुंबात नव्या पाहुणीच आगमन तर दुसरीकडे अभि आणि अनघात येणाऱ्या दुराव्यामुळे मालिकेला वेगळं वळण लागलं आहे. अरुंधती आणि आशुतोष मध्ये जवळीक वाढत आहे. पण दुसरीकडे आता अनुष्काला अनिरुद्धने अरुंधती आणि आशुतोष लग्न करणार असल्याचं सांगत तिला धक्का दिला आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे नेमकं काय घडणार ही उत्सुकता प्रेक्षकांना आहे. पण आता मालिकेत वेगळाच ट्विस्ट येणार आहे. अखेर आशुतोषला दोघींमधून एकीची निवड करावी लागणार आहे. सध्या मालिकेत अरुंधती आणि इशाच्या कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमामध्ये इशा आपल्याला डान्स करताना दिसून येणार आहे. तर अरुंधती आणि आशुतोष सुंदर असं गाणं म्हणताना दिसून येणार आहेत. सध्या मालिकेचा एक रंजक प्रोमो समोर आला आहे. सिरीयल जत्राने पोस्ट केलेल्या या प्रोमोमध्ये आशुतोषसमोर एक नवं आव्हान उभं राहणार असं दिसत आहे. हेही वाचा - Gandhi Godse –Ek Yudh:मग मुलाचं नाव जहाँगीर का?चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने नेटकऱ्यांना दिलं परखड उत्तर खरतर सध्या मालिकेत गायनाची स्पर्धा चालू आहे. त्यात अरुंधतीने देखील सहभाग घेतला आहे. तर आशुतोष या स्पर्धेचं परीक्षण करत आहे. मात्र आता या स्पर्धेत अरुंधती आणि अनुष्का मध्ये गाण्याची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. अनुष्का जरी अरुंधतीची मैत्रीण असली तरी तिला आता या दोघांविषयीचं सत्य समजलं आहे. त्यामुळे तीचा अरुंधतीवर राग आहे. त्यामुळे आता अनुष्का मालिकेत कोणतं नवं वादळ आणते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मध्यंतरी अनुष्काने आशुतोष वरील प्रेमाची कबुली दिली होती. एवढंच नाही तर ती पुन्हा मुंबईत देखील आशुतोष मुळेच आली होती. तर आशुने देखील ‘मला तू आवडतेस’ अशी कबुली दिली होती. पण त्याचं प्रेम मात्र अरुंधतीवरच आहे हे आजपर्यंत स्पष्ट झालंच आहे. पण आता अनुष्कामुळे या दोघांच्या नात्याला पुन्हा वेगळं वळण येणार आहे. एकीकडे अरुंधती आणि आशुतोष मनाने एकत्र येत असताना दुसरीकडे मात्र अनुष्का त्यांच्यातील व्हिलन ठरणार का, ती नेमकं काय करणार हे पाहणं महत्वाचं आहे.
दरम्यान मालिकेत ईशासोबत आणखीन काही घडणार असल्याचं दिसून येत आहे. ज्या मुलांनी ईशाची छेड काढली होती. ती मुले पुन्हा कॉलेजमध्ये आलेली पाहून इशा घाबरुन जाते. यावर अनिश तिला ती पुन्हा तुझा वाटेवर जाणार नसल्याचं समजावून सांगत असतांना दिसून येतो.त्यामुळे मालिकेत ईशाचा भूतकाळ पुन्हा समोर येणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.