मुंबई, 21 एप्रिल : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) मुंबईतील ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात ते आज सील करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सोसायटीमधील एका ब्लॉकमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. ओबेरॉय स्पिंग नावाच्या या प्रसिद्ध सोसायटीमध्ये विकी, राजकुमार बरोबरच चित्रांगदा आणि असे अनेक बॉलिवूड कलाकार वास्तव्यास आहेत. त्यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्पॉटबॉयच्या एका रिपोर्टनुसार या हाऊसिंग सोसायटीच्या सी-विंगमध्ये एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे. या विंगमध्ये राहणाऱ्या डॉक्टरच्या 11 वर्षांच्या मुलीला कोरोना झाला आहे. मात्र अद्याप ही बाब स्पष्ट नाही झाली आहे की, ही संपूर्ण सोसायटी आणि तिथला परिसर सील करण्यात आला आहे की केवळ सी-विंग सील करण्यात आली आहे. (हे वाचा- Lockdown मध्ये कार्तिक आर्यनला रोज खावा लागतोय बहिणीचा मार, शेअर केला Video ) या इमारतीच्या सी-विंगमध्ये अर्जुन बाजवा, चित्रांगदा सिंह, राहुल देव आणि मुगधा गोडसे, चाहत खन्ना आणि प्रभू देवा यांसारखे कलाकार राहतात. यापैकी बाजवा यांनी स्पॉटबॉयला अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘सध्या ते लिफ्टपर्यंत जाणं सुद्धा टाळत आहेत. त्याचप्रमाणे ए आणि बी विंगसुद्धा पूर्णपणे क्वारंटाइन करण्यात आली आहे.’ त्याचप्रमाणे अशी माहिती मिळते आहे की मुंबई महानगरपालिकेने हा संपूर्ण परिसर सॅनिटाइझ केला आहे. कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी या परिसरातील लोकांना माहिती देखील देण्यात येत आहे. (हे वाचा- VIDEO: मास्क नसेल तरी नो टेन्शन! रोनीत रॉयने त्याऐवजी केला जुन्या टी-शर्टचा वापर) बॉलिवूडमध्ये कोरोनामुळे शूटिंग थांबले आहे, अनेक चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच काही बॉलिवूड कलाकारांशी संंबंधित व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या पुढे येत असल्याने चिंतेमध्ये भर पडली आहे. संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.