मुंबई, 21 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वांना घरी राहावं लागत आहे. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची सुरक्षा म्हणून प्रत्येकजण घरी राहत आहे. अशात नेहमी बीझी राहणाऱ्या बॉलिवूड स्टार्सकडे सध्या बराच वेळ रिकामा आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच सिनेमांचं शूटिंग थांबलं आहे. त्यामुळे सर्व बॉलिवूड स्टार्स सध्या सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. मात्र सध्या लॉकडाऊनमध्ये सेलिब्रेटी त्यांचा दिवस कसा घालवतात याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. याचं उत्तर सुद्धा अभिनेता कार्तिक आर्यननं त्याच्या इन्स्टाग्राम व्हिडीओतून दिलं आहे.
कार्तिक आर्यन मागच्या काही काळापासून त्याच्या बहिणीसोबतचे फोटो शेअर करताना दिसत आहे. असाच आणखी एक व्हिडीओ त्यानं नुकताच शेअर केला आहे ज्यात त्यानं रोज त्याच्या दिवसाची सुरुवात कशी होते आणि त्यांनंतर त्याचा दिवस कसा संपतो हे सांगितलं आहे. कार्तिकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक त्याची बहीण कृतिका तिवारीसोबत मस्ती करताना दिसत आहे.
बॉलिवूड स्टार्सची स्टाइल 10 वर्षांपूर्वी होती अशी, PHOTOS पाहून पोट धरुन हसाल
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये बहीण कृतिका कार्तिकची पार्टनर इन क्राइम झाली आहे. या व्हिडीओमध्ये कृतिका आणि कार्तिक खोटी खोटी स्ट्रिंग टेस्ट करताना दिसत आहेत. कृतिका कार्तिकच्या कानातून खोटी खोटी स्ट्रिंग खेचून काढण्याची नक्कल करताना दिसत आहे. जेव्हा कार्तिक तिला विचलीत करतो तेव्हा ती त्याच्या कानाखाली मारते. कार्तिकनं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सकाळी उठा, आंघोळ करा, मार खा आणि झोपून जा. #QuarantineLife.'
Lockdown मध्ये या बॉलिवूड स्टार्सनी आठवले जुने दिवस आणि शेअर केले HOT PHOTOS
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी कार्तिक आणि कृतिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात कृतिका त्याला चपाती देताना दिसत होती. जी कार्तिकला अजिबात आवडत नाही त्यामुळे मग तो तिची वेणी पकडून तिला गोल गोल फिरवतो. या व्हिडीओला कार्तिकनं कॅप्शन दिलं होतं, 'क्वालिटी सोबत कधीच तडजोड नाही.' त्याच्या या व्हिडीओमुळे सर्वांनाच कबीर सिंह सिनेमाची आठवण आली होती.
'Tom And Jerry' आणि 'Popeye'च्या दिग्दर्शकाचे निधन, वयाच्या 95व्या वर्षी मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Kartik aryan