Home /News /entertainment /

मास्क नसेल तरी नो टेन्शन! रोनीत रॉयप्रमाणे तुम्हीही करू शकता जुन्या टी-शर्टचा वापर, पाहा VIDEO

मास्क नसेल तरी नो टेन्शन! रोनीत रॉयप्रमाणे तुम्हीही करू शकता जुन्या टी-शर्टचा वापर, पाहा VIDEO

जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार घरगुती मास्कचा वापर करा असे आवाहन केले आहे. अभिनेता रोनीत रॉयने सोपा घरगुती मास्क कसा बनवायचा यासंदर्भात एक व्हिडीओ पोस्ट कला आहे.

    मुंबई, 20 एप्रिल : देशामध्ये प्रत्येकजण कोरोनाशी लढाई देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनची घोषणा करताना आणि इतर वेळी जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वारंवार घरगुती मास्कचा वापर करा असे आवाहन केले आहे. त्यांच्या संवादावेळी त्यांनी सुद्धा घरगुती मास्कच वापरला होता. त्यानंतर सोशल मीडियावर घरगुती मास्क कसा वापरावा याचे व्हिडीओ अनेकांनी पोस्ट केले आहेत. काही सेलिब्रिटींनी तर नेतेमंडळींनी सुद्धा घरगुती मास्क वापरण्याबाबत व्हिडीओ शेअर केले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सुद्धा (Smriti Irani) घरातच मास्क कसा बनवावा याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. (हे वाचा-VIDEO:सलमान खान म्हणतोय 'प्यार करोना', COVID-19 वरील गाणं सोशल मीडियावर व्हायरल) दरम्यान आता अभिनेता रोनीत रॉय (Ronit Roy) याने सुद्धा एक वेगळा मास्क बनवल्याचा व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा मास्क बनवण्यासाठी कोणत्याही शिवणकामाची गरज नाही आहे. याकरता तुम्हाला फक्त एका स्वच्छ टी-शर्टचा वापर करायचा आहे. रोनीतने त्याच्या व्हिडीओमध्ये सांगितलेल्या काही स्टेप्स फॉलो करत अवघ्या काही सेकंदात तुम्ही मास्क बनवू शकता. हा व्हिडीओ शेअर करताना, 'नो मास्क? टेन्शन नहीं लेनेका, सिंपल हैं.' असं कॅप्शन रोनीतने दिलं आहे. त्यामुळे खरच जर तुम्हाला जवळपासच्या मेडिकलमध्ये मास्क उपलब्ध होत नसेल तर हा घरच्या घरी मास्क नक्कीच बनवू शकता. विशेष म्हणजे या मास्कची क्षमता तपासून पाहण्यासाठी रोनीतने लायटर पेटवून त्याच्या चेहऱ्याजवळ आणला आणि फूंकर मारून पाहिली. तरीही लायटरची ज्योत विझली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त युजर्सनी तो पाहिला आहे तर 24 हजारांहून अधिक जणांनी लाइक केला आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या