जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सुशांत सिंह आणि दिशाची एका पाठोपाठ आत्महत्या, धक्कादायक माहिती आली समोर!

सुशांत सिंह आणि दिशाची एका पाठोपाठ आत्महत्या, धक्कादायक माहिती आली समोर!

सुशांत सिंह आणि दिशाची एका पाठोपाठ आत्महत्या, धक्कादायक माहिती आली समोर!

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येमुळे अवघं बॉलिवूड हादरलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जून: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येमुळे अवघं बॉलिवूड हादरलं आहे. बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ दोन आत्महत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, एक आठवड्यापूर्वीच सुशांतची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन हिनेही आत्महत्या केली होती. दिशा आणि सुशांत याच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट नाही आहे. मात्र, दोघांच्या आत्महत्येमध्ये काही कनेक्शन आहे का? दिशा-सुशांतची आधीची मॅनेजर असल्याने सुशांतसोबत तिच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमध्ये उलटसूलट चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा… इरफान खानच्या निधनानंतर सुशांत सिंहला मिळाला होता हा चित्रपट, मात्र आता… ‘छिछोरे’ या सिनेमात सुशांत सिनेमातील आपल्या मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखतो. पण दुर्देव बघा रिअल लाईफमध्ये सुशांत स्वत: ला आत्महत्या करण्यापासून रोखू शकला नाही. सुशांतच्या आत्महत्येमुळे अवघं बॉलिवूड हादरलं आहे. पण दुसरीकडे मात्र सुशांतच्या आत्महत्येमुळे एका आठवड्यापूर्वीच सुशांतची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन हिच्या आत्महत्येचा विषय देखील पुन्हा चर्चेला आला आहे. तसं पहायला गेलं तर सुशांतची पूर्वीची मॅनेजर या पलिकडे दिशाचे नाव सुशांतशी जोडले गेलं नाही. पण दोघांनी एका पाठोपाठ आत्महत्या केल्यानं आता दोघांच्या आत्महत्येत काही कनेक्शन आहे का? या चर्चेनं जोर धरला आहे. पण अतिशय भावनिक आणि करिअरवर फोकस करणारा सुशांत असं पाऊल उचलून कसं शकतो? असं त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांनी भावना व्यक्त केल्या आहेत. दिशा सालियन हिनं गेल्या सोमवारी (8 जून) मालाड येथील राहत्या घरातून खाली उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर रविवारी (14 जून) दुपारी 12.30 च्या दरम्यान सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. दिशा आत्महत्या प्रकरणी पोलिस दिशाच्या मित्रांची चौकशी करत आहे. मित्रांसोबत झालेल्या पार्टीनंतर दिशाने आत्महत्या केली होती, असं तपासात समोर आलं आहे. तर सुशांतने आत्महत्या केली तेव्हा त्याच्या घरात काम करणारे 4 जण होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हेही वाचा… DEPRESSION मध्ये होता सुशांत सिंह राजपूत; ‘ही’ आहेत लक्षणं सुशांतने आर्थिक सकंटांमुळे आत्महत्या केली असावी, असंही बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सुशांत प्रचंड मानसिक तणावाखाली होता. यामुळे त्याला नैराश्य आलं होतं. सुशांत गेल्या काही दिवसांपासून कोणाच्याच संपर्कात नव्हता. पोलिस आता सुशांतचे बॅंक अकाऊंट आणि आर्थिक व्यवहार तपासत आहेत. तर सुशांतचे फोन रेकॉर्डही तपासले जात आहेत. प्रथम दर्शनी पोलिस तपासात दिशा आणि सुशांत यांच्या आत्महत्येचे काही कनेक्शन समोर येत नाही आहे. पण सुशांत आणि दिशाच्या एका पाठोपाठ आत्महत्येने बॉलिवूडसह सर्वत्रच ठिकाणी विविध चर्चांना उधाण आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात