इरफान खानच्या निधनानंतर सुशांत सिंहला मिळाला होता हा चित्रपट; अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर आता...

इरफान खानच्या निधनानंतर सुशांत सिंहला मिळाला होता हा चित्रपट; अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर आता...

आपल्या दर्जेदार चित्रपटांमधून सुशांत सिंहने चाहत्यांना भुरळ घातली होती. त्याच्या एग्जिटमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे

  • Share this:

मुंबई, 14 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने रविवारी मुंबईच्या वांद्रे येथील आपल्या घरी आत्महत्या केली. आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या का केली? हे अद्याप समजू शकलेले नाही.

अभिनेत्याच्या घरी काम करणाऱ्या सेवकाने पोलिसांना त्याच्या आत्महत्येबद्दल (Sushant Singh Rajput Suicide)  माहिती दिली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. सध्या त्याच्या आत्महत्येचा तपास सुरू आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर ‘तुंबड’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद गांधी यांचा महामारीवरील आधारित चित्रपट 'आणीबाणी' पुन्हा एकदा अधांतरी राहिला आहे.

29 एप्रिल रोजी बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान मरण पावला होता. अभिनेत्याच्या मृत्यूच्या आधी आनंद गांधींनी त्याला एका चित्रपटात कास्ट करण्याचं ठरवलं होतं. बॉलिवूड लाइफ डॉट कॉमच्या वृत्तानुसार, गांधींचा हा चित्रपट कोरोना विषाणूसारख्या साथीवर आधारित आहे. पण इरफानच्या निधनानंतर हा चित्रपटाची तयारी अर्धवट राहिली. चित्रपटाविषयी बोलताना आनंद गांधी म्हणाले होते की, आता इरफान खान या जगात नाही म्हणून ते पटकथेमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे.

आनंद गांधींनी सांगितले होते की, सध्या या प्रोजेक्टचे नाव बदलून 'आणीबाणी' करण्यात आले असून चित्रपटात इरफान खान याची जागा अभिनेता सुशांत सिंह राजपूत घेईल. सुशांत सिंह राजपूत व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन अभिनेता ह्यूगो वीव्हिंगलाही या चित्रपटात कास्ट करण्याची चर्चा आहे. पण आता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर आनंद गांधींसाठी हा मोठा धक्का आहे.

हे वाचा-आत्महत्येप्रकरणी अखेर सुशांतच्या टीमने जारी केलं अधिकृत स्टेटमेंट

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 14, 2020, 6:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading