मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

युवकांचा पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर हल्ला; आधी भररस्त्यात कपडे फाडले, मग...

युवकांचा पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर हल्ला; आधी भररस्त्यात कपडे फाडले, मग...

काही युवकांनी एका एसएचओच्या (SHO) मुलीचे भररस्त्यात कपडे फाडले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर तरुणीनं पळ काढण्याचा प्रयत्न करताच हे सर्व तलवारी हातात घेऊन तिचा पाठलाग करू लागले.

  • Published by:  Kiran Pharate

चंदीगड 24 मे : पोलिसांबाबत (Police) प्रत्येकाच्या मनात एक आदरायुक्त भीती असते. मात्र, अनेकदा पोलिसांच्याच कुटुंबातील सदस्यांवर गंभीर हल्ले झाल्याच्या घटनाही समोर येत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत काही युवकांनी एका एसएचओच्या मुलीचे भररस्त्यात कपडे फाडले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर तरुणीनं पळ काढण्याचा प्रयत्न करताच हे सर्व तलवारी हातात घेऊन तिचा पाठलाग करू लागले. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. ही घटना पंजाबच्या (Punjab) फिल्लौरमधील (Phillaur) लुधियाना (Ludhiana) येथील आहे.

Black, White नंतर Yellow Fungus, आणखी एक भयंकर फंगल इन्फेक्शन; अशी आहेत लक्षणं

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या माहेरी राहाण्यासाठी आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून तिच्या मुलीची तब्येत खराब असल्यानं ती आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला भावासोबत फिल्लौरमधील एका रुग्णालयात घेऊन गेली होती. यानंतर संध्याकाळी घराकडे निघाले असता गावातीलच काही तरुणांनी त्यांना अडवलं.

हृदयद्रावक! मुलाच्या दारुच्या बाटलीनं घेतला बापाचा जीव;90 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

आम्हाला का अडवलं? असा सवाल केला असता या तरुणांनी महिलेच्या भावाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या युवकांनी यादरम्यान महिलेचे कपडेही फाडले. आपल्या चिमुकलीला घेऊन तिनं भावासोबत गावाची वाट धरली. मात्र, या युवकांनी हातात तलवारी घेऊन त्यांचा पाठलाग केला. युवकांनी त्यांच्यावर विटा आणि दगडानं वारही केले. यामुळे रस्त्यातील एका गाडीच्या काचाही फुटल्या. पोलीस ठाण्यात एका ठाणेदारानं सांगितलं, की पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीला रस्त्यात अडवून तिचे कपडे फाडल्याप्रकरणी आणि पाठलाग केल्याप्रकरणी गोपा, लव आणि त्याच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Crime news, Police