लखनऊ, 24 मे : देशात आधीच कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट, त्यात ब्लॅक फंगस (Black Fungus) आणि नंतर व्हाइट फंगसचं (White Fungus) संकट. हे कमी की काय म्हणून आता यलो फंगसचंही (Yellow fungus) नवं आव्हान उभं ठाकलं आहे. देशात ब्लॅक, व्हाइट फंगसनंतर आता यलो फंगसचंही संकट ओढावलं आहे. देशात यलो फंगसचा पहिला रुग्ण सापडला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये यलो फंगसचं पहिलं प्रकरण दिसून आलं आहे. 45 वर्षांच्या व्यक्तीला यलो फंगसचा संसर्ग झाला आहे.हा फंगस ब्लॅक आणि व्हाइडपेक्षाही यलो फंगस अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे.
Ghaziabad | A 45-yr-old patient's sinus was normal in CT scan but after performing endoscopy we came to know that he contracted 3 types of fungi (Black, White & Yellow). Yellow fungus is generally found in reptiles. I found this first time in human: Dr BP Tyagi, ENT specialist pic.twitter.com/i5e1Cn0ttt
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 24, 2021
कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. बीपी त्यागी यांनी सांगितलं, सीटी स्कॅनमध्ये 45 व्यक्तीचं सायनस सामान्य होतं. पण जेव्हा आम्ही एन्डोस्कोपी केली तेव्हा त्याला ब्लॅक, व्हाइट आणि यलो असे तीन प्रकारचे फंगल इन्फेक्शन असल्याचं समजलं. हे वाचा - Vaccination मोठी बातमी! आता ऑनलाईन रजिस्टर न करता 18 ते 44 वयोगटालाही मिळणार लस सामान्यपणे यलो फंगस सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आढळतं. पहिल्यांदाच मला हे माणसांमध्ये दिसून आलं आहे. कोणत्याही जनरलमध्ये याबाबत काही माहिती नाही. हा संसर्ग Amphotericin B ने बरा होऊ शकतो, पण व्हाइट आणि ब्लॅक फंगसच्या तुलनेत यलो फंगसमध्ये जखम बरी होण्यास वेळ लागतो, असंही डॉ. त्यागी यांनी सांगितलं. थकवा किंवा सुस्तपणा, कमी भूक किंवा भूक न लागणे, वजन कमी होणं, जखम बरी होण्यास वेळ लागणं, डोळे आत जाणं ही यलो फंगसची लक्षणं आहेत. अशी लक्षणं दिसल्याच त्याकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांकडे जा. हे वाचा - रुग्ण घटले, मृतांचा आकडा जैसे थे; मृत्यूदराच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर मिळालेल्या माहितीनुसार अस्वच्छतेमुळेही हा आजार होऊ शकतो. त्यामुळे स्वच्छता राखा. शिळं किंवा खराब अन्न जास्त काळ ठेवू नका.