Home /News /crime /

नेमकं कोणी कोणाला फसवलं? मुंबईतील अनोखी Love Story; प्रकरण पाहून पोलिसही बुचकळ्यात

नेमकं कोणी कोणाला फसवलं? मुंबईतील अनोखी Love Story; प्रकरण पाहून पोलिसही बुचकळ्यात

मुलीनं असा आरोप केला आहे, की युवकानं विवाहित असल्याचं लपवून तिच्यासोबत लग्न (Marriage) केलं. तिला बायकोप्रमाणे ठेवले आणि आता मुंबई (Mumbai) सोडून गावी निघून आला आहे.

    नवी दिल्ली 01 जुलै : राजस्थानच्या (Rajasthan) जालोर जिल्ह्यातील जसवंतपुरा पोलीस ठाण्यात एका तरुणाने एक युवती आणि एका युवकाविरूद्ध एका षडयंत्रात अडकवल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यात त्यानं सांगितलं, की हे दोघेही त्याला ब्लॅकमेल करीत आहेत आणि पाच लाख रुपयांची मागणी करीत आहेत. असं न केल्यास त्याला या प्रकरणात फसवण्याची आणि तक्रार करण्याची धमकी देत ​​आहेत. याच प्रकरणात मुलीनं असा आरोप केला आहे, की युवकानं विवाहित असल्याचं लपवून तिच्यासोबत लग्न (Marriage) केलं. तिला बायकोप्रमाणे ठेवले आणि आता मुंबई (Mumbai) सोडून गावी निघून आला आहे. या प्रकरणी तरूणाने जसवतपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. भीमाराम पुत्र प्रतापराम सुथार या तरुणानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे, की तो मुंबईत एका मोबाईलच्या दुकानात (Mobile Shoppy) काम करत होता. तीन-चार वर्षांपूर्वी मुंबईतील अनिता नावाच्या एका तरुणीसोबत त्याची सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून ओळख झाली. यानंतर एक दिवस त्याच्या मामाचा मुलगा छगनाराम या तरुणीला घेऊन मोबाईलच्या दुकानात आला आणि ही आपली मैत्रीण असून तिला काही मदत लागल्यास कर, असं सांगितलं. अनितानं भीमारामकडे 25 हजार रुपये उधार मागितले मात्र तिनं यातील आठ हजार रुपयेच परत दिले. याच मुद्द्यावरुन ते दोघंही आता भीमाराम याला ब्लॅकमेल करत असून लग्नासाठी दबाव टाकत आहेत. छगनारामचं म्हणणं आहे, की पाच लाख रुपये दिल्यास हे प्रकरण मिटवून घेऊ. अन्यथा तुला यामध्ये वाईट पद्धतीनं फसवू, असंही तक्रारीत म्हटलं आहे. लॉकडाऊनमुळे भीमाराम आपल्या गावी परतला आहे. 17 जून रोजी अनिता आणि छगनारामही गावातील त्याच्या घरी पोहोचले आणि इथे जाऊन गोंधळ घातला. यादरम्यान त्यांनी भीमारामच्या कुटुंबीयांकडे पाच लाखाची मागणी केली. असं न केल्यास आपण आत्महत्या करू अशी धमकी अनिता देत राहिली, असंही त्यानं म्हटलं. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. भावानं बहिणीसाठी प्रेमानं जेवण पाठवलं घरी, डिलिव्हरी बॉयकडूनच डॉक्टरवर बलात्कार अनितानं असा आरोप केला आहे, की भीमाराम विवाहित आहे मात्र त्यानं ही गोष्ट तिच्यापासून लपवली आमि तिच्यासोबत लग्न केलं. लॉकडाऊन लागताच तो मुंबई सोडून गावी निघून आला, अशात मी जीवन कसं जगू, असा सवाल अनितानं केला आहे. माझ्यासोबत आता कोण लग्न करेल, असंही तिनं म्हटलं आहे. आपण पैशाची मागणी केली नसून भीमा खोटे आरोप करत असल्याचं तिनं म्हटलं आहे. बाप-लेकीचे हातपाय बांधून 25 शेळ्या पळवल्या; घटनेने एकच खळबळ सोशल मीडियावर सध्या दोन व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहेत. यात अनिता म्हणत आहे, की तिला पैसे नको, भीमा पाहिजे. भीमा वारंवार पळून जात आहे. एकतर माझा जीव घ्या नाहीतर माझ्याबद्दल काहीतरी निर्णय द्या. रस्त्यातही मला काही झालं तर भीमाच जबाबदार असेल. व्हायरल व्हिडिओमध्ये भीमाचे कुटुंबीयही तिला समजावताना दिसले. याचदरम्यान अनितानं भीमाच्या कुटुंबीयांना सुसाईड नोट वाचून दाखवत आहे. ती म्हणते की मी आता आत्महत्या करणार आणि भीमा तुरुंगात जाणार. मी तक्रार करायला जात होते, मात्र त्याच्या आईनं घरी बोलावलं. इतक्यात ही तरुणी जवळच असलेल्या एका विहिरीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते मात्र भीमाचे कुटुंबीय तिला अडवतात.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Couple, Crime, Love story

    पुढील बातम्या