मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ग्रामीण भागात बकरी चोरांची दहशत; बाप-लेकीचे हातपाय बांधून 25 शेळ्या पळवल्या

ग्रामीण भागात बकरी चोरांची दहशत; बाप-लेकीचे हातपाय बांधून 25 शेळ्या पळवल्या

Goat theft in Marathwada: कोरोना संकटात शेतकऱ्यांवर नवं संकट ओढावलं आहे आणि ते म्हणजे जनावरांची होत असलेली चोरी. गेल्या काही दिवसांपासून जनावरांची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

बीड, 30 जून: बाप-लेकीचे हातपाय बांधत दरोडेखोरांनी 25 शेळ्या पळवल्याची (25 goat theft)  धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील (Beed District) धारूर तालुक्यातील अरणवाडी (Aranwadi Dharur) येथे आज हा प्रकार उघडकीस आला आहे. लहान-मोठ्या 25 शेळ्या चोरून नेल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. इतकेच नाही तर या चोरट्यांनी बाप आणि लेकीला मारहाण सुद्धा केली आहे. जखमी बाप आणि लेकीला धारूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने धारूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

धारूर तालुक्यातील अरणवाडी येथील 80 वर्षीय अर्जुन डोंगरे आणि त्यांची मुलगी कौशल्या अभिमान भालेराव (48 वर्षे) हे दोघे गावाच्या जवळच राहतात. त्यांच्याकडे लहान मोठ्या 25 शेळ्या आहेत. मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान 4 चोरट्यांनी येवून या दोन्ही बापलेकीला मारहाण करत त्यांचे हातपाय बांधले. यानंतर त्यांच्याकडील सर्व शेळ्या एका वाहनात घालून चोरून नेल्या.

घटना घडल्यानंतर बाजुला राहणार्‍या एका व्यक्तीच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्या व्यक्तीने बीड पोलीसांशी संपर्क साधला. बीड पोलिसांनी याची माहिती धारूर पोलिसांना दिली. त्यानुसार धारूर पोलिसांनी घटनास्थळी जावून या जखमी बापलेकीला रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

जालन्यात बकरी चोर सीसीटीव्हीत कैद

जालना जिल्हाचा सीमावर्ती भाग असलेल्या बदनापूर आणि भोकरदन तालुक्यातील परिसरात बैल, बकऱ्या अशा मुक्या जनावरे चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विक्रम वानर्से या शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यातून देखील 20 हजार रुपये किमतीची एक बकरी चोरट्यांनी चोरून नेली.

शेतकऱ्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांनी एका दुचाकीवरून ही बकरी चोरून पोबारा केला. दरम्यान, दुचाकीवरून बकरी चोरून घेऊन जाताना अचानक गाडीतील पेट्रोल संपले. पेट्रोल भरण्यासाठी गेले असता बकरीचोर पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

First published:

Tags: Beed, Crime