Home /News /crime /

धक्कादायक! भावानं बहिणीसाठी प्रेमानं जेवण पाठवलं घरी, डिलिव्हरी बॉयकडूनच डॉक्टरवर बलात्कार

धक्कादायक! भावानं बहिणीसाठी प्रेमानं जेवण पाठवलं घरी, डिलिव्हरी बॉयकडूनच डॉक्टरवर बलात्कार

सुकांत बेहरा असं आरोपीचं नाव असून तो एका ढाब्याच्या मालकाचा मुलगा (Dhaba Owner's Son) आहे. त्यानं 32 वर्षीय डॉक्टरवर बलात्कार केला आहे.

    नवी दिल्ली 01 जुलै: मंगळवारी रात्री एका महिला डॉक्टरवर तिच्याच घरात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली (Man Arrested for Allegedly Raping a Female Doctor) आहे. सुकांत बेहरा असं आरोपीचं नाव असून तो एका ढाब्याच्या मालकाचा मुलगा (Dhaba Owner's Son) आहे. त्यानं 32 वर्षीय डॉक्टरवर बलात्कार केला आहे. डॉक्टरच्या घरी फूडची डिलिव्हरी (Food Delivery) करण्यासाठी गेला असता आरोपीनं हे कृत्य केलं आहे. हे प्रकरण ओडिसाच्या (Odisha) अंगुल जिल्ह्यातील आहे. मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरण; आरोपीला बारामतीमधून अटक मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका आरोग्य केंद्रात काम करते आणि ती आपल्या भावासोबत केंद्राकडून देण्यात आलेल्या एका क्वार्टरमध्ये राहात होती. पोलिसांनी सांगितलं, की ही घटना घडली तेव्हा ती एकटीच याठिकाणी होती. मंगळवारी पीडितेच्या भावानं तिच्यासाठी एका स्थानिक ढाब्यावरुन जेवण पाठवलं. तो स्वतःही याच ढाब्यावर बसून जेवत होता. या ढाब्याच्या मालकाचा मुलगा सुकांत रात्री सुमारे अकरा वाजता जेवण घेऊन पीडितेच्या घरी पोहोचला. यानंतर डॉक्टर तरुणी ही घरात एकटी असल्याचं पाहून तो आतमध्ये शिरला. यानंतर त्यानं परिस्थितीचा फायदा घेत डॉक्टर महिलेवर बलात्कार केला. मामाच्या एका मुलीशी केलं लग्न अन् दुसरीलाही नेलं पळवून; भाच्याची निर्घृण हत्या या प्रकरणी बहीण-भावानं छेंडीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. डॉक्टरांना मेडिकल तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Rape news

    पुढील बातम्या