सुशील कौशिक/भोपाळ, 10 फेब्रुवारी : व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. या कालावधीत आधीपासून प्रेमात असलेले कपल आपल्या प्रेमाला अधिक फुलवत आहेत, तर काही जणांचं प्रेम नुकतंच फुलत आहे. अशाच व्हॅलेंटाइन वीकमध्ये प्रेमात पडून लग्न केलेल्या कपलच्या लव्ह मॅरेजचा धक्कादायक द एंड झाला आहे. लग्नाच्या तीन वर्षांनंतर भयंकर घडलं आहे. मध्य प्रदेशमधील ही धक्कादायक घटना आहे.
ग्वालियरच्या किशन बाग परिसरात राहणारा 35 वर्षांचा अवधेश वंशकार 3 वर्षांपूर्वी सोनमला पहिल्यांदाच भेटला. ग्वालियर रेल्वे स्टेशनवर त्यांची पहिली भेट झाली. तेव्हा वॅलेंटाइन वीक सुरू होता. दोघंही एकमेंकाच्या प्रेमात पडले. सोनमचं कुटुंब नव्हतं त्यामुळे त्यांच्या लग्नात काही अडचण आली नाही. तिने अधवेशशी लग्न केलं. लव्ह मॅरेजनंतर दोघांचा संसार सुखाने सुरू होता. पण काही महिन्यांपूर्वी त्यांच्या आयुष्यात असं काही घडलं की त्यामुळे त्यांच्या सुखी संसारात वादळ आलं. यानंतर अधवेशने स्वतःच्या हातानेच सोनमला संपवलं.
हे वाचा - लेकाचं लग्न बाबाच्या जीवावर बेतलं! तो विषयच नको म्हणून मुलाने म्हाताऱ्या वडिलांनाच संपवलं
दुसऱ्या दिवशी सकाळी तो पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने स्वतःच पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. बहोड़ापूर पोलीस ठाण्यात त्याने आपण आपल्या पत्नीची हत्या केल्याचं सांगितलं.त्यानंतर पोलीस त्याच्या घरी पोहोचले. तिथं सोनमचा मृतदेह दिसला. तिच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या. अधवेशने तिला काठीने मारहाणही केली होती.
व्हॅलेंटाईन वीकमध्ये सुरू झालेल्या या लव्ह स्टोरीचा व्हॅलेंटाइन डेमध्येच भयंकर शेवट झाला. याचं कारण ठरला तो त्या दोघांमध्ये आलेली ती तिसरी व्यक्ती. अधवेशच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी सोनमची झांशीतल्या एका तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर त्या दोघांचं भांडण झालं आणि अधवेशने रागात असं धक्कादायक पाऊल उचललं.
हे वाचा - अरुणसाठी वेडी झाली कतरिना! कोरोना काळात मैत्री, नंतर प्रेम आणि आता लग्न; पाहा PHOTO
अधवेशच्या आईने पोलिसांना सांगितलं की, 3 दिवसांपूर्वी झांशीतल्या तरुणाने अधवेशच्या मोबाईलवर सोनमचा अश्लील फोटो पाठवला. सोनमला त्याच्यासोबत व्हॉट्सअॅपवर चॅट करताना त्याने पाहिलं. यावरून दोघांमध्ये भांडण झालं. 9 फेब्रुवारीला त्यांचा वाद इतका विकोपाला गेला की अधवेशने धारदार शस्त्राने सोनमवर वार केले. त्याने तिची निर्घृण हत्या केली.