रूपेश कुमार भगत/रांची, 09 फेब्रुवारी : आपल्या मुलांचं लग्न व्हावं, ते संसाराला लागावेत असं प्रत्येक पालकांचं स्वप्नं असतं. पण मुलाच्या लग्नाचं असंच स्वप्नं एका वडिलांच्या जीवावर बेतलं आहे. लग्नासाठी मागे लागलेल्या वडिलांसोबत मुलानेच धक्कादायक कृत्य केलं आहे. वडिलांनी लग्न कर म्हणताच मुलाने धक्कादायक पाऊल उचललं. लग्नाचा विषयच नको म्हणून त्याने म्हाताऱ्या वडिलांनाच संपवून टाकलं आहे. झारखंडच्या गुमलामधील ही धक्कादायक घटना आहे. पाकरा पाहन टोली गावात राहणारे 67 वर्षांचे बुधवा बगे यांनी त्यांचा मुलगा जितन बगेला लग्न करण्याचा लग्न सल्ला दिला. वडिलांनी लग्न कर म्हणतात जितनला राग आला आणि त्याने वडिलांना लाथ मारली. त्याने आपल्या पायांनी इतका जोरात हल्ला केला की त्यांचा मृत्यूच झाला. हे वाचा - साखरपुड्यानंतर तरुणीचा लग्नाला नकार; तरुणाचं होणाऱ्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य, पोलीसही हादरले घटनेवेळी वडील आणि मुलगा दोघंच घरात होते. घरातील इतर सदस्य जेव्हा घरी परतले, तेव्हा त्यांना बुधवा जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांचा मृत्यू झाला होता. मुलानेच वडिलांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. हे वाचा - धक्कादायक! गरम जेवण मागितलं अन् नवरदेवाच्या भावासोबत घडलं भयानक स्टेशन प्रभारी कौशलेंद्र कुमार यांनी सांगितले की, आरोपी मुलाला अटक करण्यात आली असून त्याला चौकशीनंतर कारागृहात पाठवण्यात आले आहे. गुन्हा दाखल करून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.