जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अरुणसाठी वेडी झाली कतरिना! कोरोना काळात मैत्री, नंतर प्रेम आणि आता लग्न; पाहा PHOTO

अरुणसाठी वेडी झाली कतरिना! कोरोना काळात मैत्री, नंतर प्रेम आणि आता लग्न; पाहा PHOTO

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

व्हॅलेंटाइन वीकमध्ये लग्नबंधनात अडकलेल्या कतरिना आणि अरुणची लव्हस्टोरी चर्चेत आली आहे.

  • -MIN READ Local18 Rajasthan
  • Last Updated :

पीयूष पाठक/अलवर, 10 फेब्रुवारी : सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. या काळात तुम्ही बऱ्याच लव्ह स्टोरी वाचल्या असतील, ऐकल्या असतील. तुम्हीही तुमची एक लव्ह स्टोरी बनवत असाल. अशीच एक लव्हस्टोरी सध्या चर्चेत आहे ती म्हणजे कतरिना आणि अरुणची. कोरोना काळात दोघांमध्ये मैत्री झाली. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. अरुणसाठी कतरिना इतकी वेडी झाली की आता वॅलेंटाइन वीकचा मुहूर्त साधत तिने त्याच्याशी लग्न ही केलं. राजस्थानच्या अल्वरमध्ये राहणारा अरुण शर्मा फिनटेक कंपनीत काम करतो. ज्याचं ऑफिस तुर्कस्तान आणि इस्तानबुलमध्ये आहे. त्यामुळे अरुणला येण्याजाण्यासाठी युक्रेनमध्ये राहावं लागतं. युक्रेनमध्ये असताना कोरोना काळात अरुणची ओळख तिथं राहणाऱ्या कतरिना कात्याशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. दोघं एकमेकांना भेटू लागले आणि त्यांच्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. हे वाचा -  मै तेरा तोता, तू मेरी मैना! Valentine week मध्ये दणक्यात पार पडला पोपट-मैनेचा अनोखा विवाहसोहळा त्यानंतर रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान कतरिनाचं कुटुंब युक्रेनमध्ये अडकलं. त्यावेळी तिच्या कुटुंबासाठी अरुण धावून आला. अरुणने कतरिनाच्या कुटुंबाला मदत केली. तेव्हापासून कतरिनाच्या कुटुंबालाही अरुण आवडू लागला. अरुणचं कुटुंबही कतरिनाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी परदेशात गेलं.  त्यानंतर कतरिना भारतात आली. अलवरमध्ये राहून तिनं भारतीय संस्कृती समजून घेतली. आता वॅलेंटाइन वीकमध्येच अरुण आणि कतरिनाचं लग्न झालं. 7 फेब्रुवारीला अलवरमधील एका रिसॉर्टमध्ये त्यांचा लग्नससोहळा पार पडला.

News18

या लग्नसोहळ्यात युक्रेन, दुबई, तुर्कस्तानसह जवळपास 9 देशांतील पाहुणे सहभागी झाले होते. या कपलला सर्वांनी आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात