जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / बायको आणि भाऊच ठरला वैरी! प्रेमात नवऱ्याने गमावला जीव, 'असा' रचला कट

बायको आणि भाऊच ठरला वैरी! प्रेमात नवऱ्याने गमावला जीव, 'असा' रचला कट

पोलिसांच्या धाकाने दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. तेव्हा या हत्येप्रकरणावरून पडदा उघडला.

पोलिसांच्या धाकाने दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. तेव्हा या हत्येप्रकरणावरून पडदा उघडला.

दोघांचं बऱ्याच दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. मात्र सागर त्यांच्यात अडथळा झाला होता. त्यामुळे त्यांनी त्याचा जीवच घ्यायचं ठरवलं. त्याला ठार करून स्वतःच्याच बांधकाम सुरू असलेल्या घरात खड्डा खणून त्याला पुरलं.

  • -MIN READ Local18 Muzaffarnagar,Uttar Pradesh
  • Last Updated :

विनेश पवार, प्रतिनिधी मुजफ्फरनगर, 16 जून : माणूस प्रेमात कधीकधी एवढा विकृत होतो की एखाद्याचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये अशाच एका खुनाने मोठी खळबळ उडाली आहे. चुलत दिराच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या बायकोने बॉयफ्रेंडच्या साथीने आपल्याच नवऱ्याचा जीव घेऊन त्याला घरात गाडलं, अशी संतापजनक घटना समोर आली आहे. संशयित म्हणून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या धाकाने दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. तेव्हा या हत्येप्रकरणावरून पडदा उघडला. पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली बांधकाम सुरू असलेल्या घरात पुरलेला मृतदेह उत्खनन करून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

पुरकाजी पोलीस ठाणा क्षेत्रातील मांडला गावातून 6 जून रोजी सागर नामक व्यक्ती अचानक गायब झाली. सागर असा अचानक गायब कसा होऊ शकतो, असा प्रश्न त्याच्या नातेवाईकांना आणि आजूबाजूच्या लोकांना पडला. लाखो प्रयत्न करूनही त्याचा काही पत्ता लागला नाही. अखेर नातेवाईकांनी पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर सागरची पत्नी आशिया आणि सावत्र भाऊ सुहेल यांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या खूनाचं रहस्य उलगडलं. सुरुवातीला दोघांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु कडक कारवाई केल्यानंतर आम्हीच सागरची हत्या केल्याचं त्यांनी सांगितलं. Rakhi Sawant : पुरूषांचा रेकॉर्ड तोडणार राखी सावंत; करणार 10-10 अफेअर्स, लकी सिंगच्या नात्यावर सोडलं मौन दोघांचं बऱ्याच दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. मात्र सागर त्यांच्यात अडथळा झाला होता. त्यामुळे त्यांनी त्याचा जीवच घ्यायचं ठरवलं. त्याला ठार करून स्वतःच्याच बांधकाम सुरू असलेल्या घरात खड्डा खणून त्याला पुरलं, अशी कबूली त्यांनी दिली, त्यानंतर तातडीने पोलिसांनी खड्ड्यातून सागरचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच दोन्ही नराधमांना अटक करण्यात आली आहे. 6 जून रोजी सागर बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांना सागरची पत्नी आणि चुलत भावाने त्याची हत्या करून मृतदेह घरातील टाकीत लपवल्याची माहिती मिळाली होती. मात्र या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कोणालाही संशय येऊ नये यासाठी त्यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घरात त्याला 9 तारखेला गाडलं, असं कळलं. दरम्यान, आता या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात