जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Rakhi Sawant : पुरूषांचा रेकॉर्ड तोडणार राखी सावंत; करणार 10-10 अफेअर्स, लकी सिंगच्या नात्यावर सोडलं मौन

Rakhi Sawant : पुरूषांचा रेकॉर्ड तोडणार राखी सावंत; करणार 10-10 अफेअर्स, लकी सिंगच्या नात्यावर सोडलं मौन

राखी सावंतच्या नव्या बॉयफ्रेंडची चर्चा

राखी सावंतच्या नव्या बॉयफ्रेंडची चर्चा

राखीने आदिल खानला जेलची हवा दाखवल्यानंतर आता तिच्या नव्या अफेअर्सच्या चर्चा सुरू झाल्यात. काय म्हणाली राखी तिच्या अफेअरबाबत पाहा.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 जून : अभिनेत्री आणि मॉडेल राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. राखी नुकतीच दुबईहून मुंबईत आली आहे. मुंबईत आल्यापासून राखीनं तिचा पापाराझींबरोबर गप्पा मारण्याचा दिनक्रम पुन्हा सुरू केला आहे. जीमच्या बाहेर, सलोनच्या बाहेर राखी सावंत पोहचली की पापाराझी तिच्या मागे कॅमेरा घेऊन पोहतात. राखीचे पापाराझींनी काढलेले व्हिडीओ आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. दुबईहून परत येताच राखीनं आदिलबरोबरच्या घटस्फोटाबद्दल पापाराझींशी संवाद साधला. तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती पुरूषांचा रेकॉर्ड तोडण्याविषयी बोलताना दिसत आहे. राखीचं रितेशबरोबर पहिलं लग्न झालं होतं. पण रितेशनं तिला सोडलं आणि त्यानंतर अनेक वर्षांनी तिनं आदिल खानबरोबर लग्न केलं. पण आता आदिलकडूनही राखीला धोका मिळाला आहे.  आदिलला राखीनं जेलमध्ये पाठवल्यानंतर त्याच्याकडून घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. राखीने आदिलवर घरघुती हिंसाचार आणि फसवणूकीचे आरोप लावले आहेत. आदिल सध्या जेलमध्ये असून तो राखी तिथून धमक्या देत असल्याचा आरोप देखील राखीने केला आहे. दरम्यान या सगळ्यात राखीच्या नव्या अफेअर्सच्या चर्चा समोर आल्यात. हेही वाचा - ना शाहरूख, ना रूपाली गांगुली, ना अमिताभ तर हा अभिनेता टीव्हीतून करतो 2200 कोटींची कमाई!

जाहिरात

सोशल मीडियावर सक्रीय असलेला इन्फ्लूएन्सर, मॉडेल असलेल्या लकी सिंहबरोबर राखीचं अफेअर सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यात राखी लकी सिंहबरोबरच्या अफेअर्सची हिंट देताना दिसत आहे. पापाराझींनी तिला लकी सिंहबरोबरच्या नात्याविषयी विचारलं. त्यावर राखी म्हणाली,  लकी माझा मित्र आहे. मी एकच गोष्ट सांगते माझं आणि लकीचं अफेअर नाहीये. ओके.. समझो यार. अजून माझा तलाक झाला नाहीये.

News18लोकमत
News18लोकमत

तलाक नाही घेतला पण प्रेम करू शकतेस ना? असं पापाराझींनी तिला विचारलं. त्यावर राखी म्हणाली, हो प्रेम करू शकते. का नको करू. कोणत्या पुस्तकात लिहिलं आहे? फक्त हिंदुस्तानच्या बॉर्डरवर लिहिलं आहे की जर मुलगी विधवा झाली तर ती प्रेम करू शकत नाही. तलाक झालं तर प्रेम करू शकत नाही. तुम्ही पुरूष एका वेळेस 4-4 मुली ठेवता. 5-5 गर्लफ्रेंड फिरवता. मग मी का नाही करू शकत. स्वत:ला मर्द म्हणवणाऱ्या सगळ्या पुरूषांचे रेकॉर्ड मी ब्रेक करेन. 10-10 अफेअर्स करेन.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात