जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Crime News : अनेक दिवसांपासून रखडलेली मर्डर केस एका Condom मुळे सॉल्व

Crime News : अनेक दिवसांपासून रखडलेली मर्डर केस एका Condom मुळे सॉल्व

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पोलिसांच्या या यशाबद्दल अधिकाऱ्यांकडून कौतुक होत असून, याचा केस स्टडी पोलिस प्रशिक्षण केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 जून : एक अनसॉल्व मर्डर मिस्ट्री अशा विचित्र पद्धतीने सॉल्व झाली आहे की, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला नक्कीच अजब वाटेल. हो कारण एका मडरची केस एका कॉन्डमने सॉल्व केली आहे. हे प्रकरण समोर आल्या नंतर लोकांच्या मनात या केसबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक्ता निर्माण झाली. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथील बेवाना पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. येथे हत्येनंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळी कोणताही पुरावा सोडला नाही. त्यामुळे खुनाचा खुलासा करणे पोलिसांसमोर आव्हान ठरले. Video Viral : चोरांची इमानदारी ज्यांना लूटायचं होतं, त्यांनाच देऊन गेले शंभराची नोट 11 जून रोजी बंद शाळेत 90 टक्के जळालेला मृतदेह सापडला होता. मृतदेह जळाला असल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. तसेच तेथे अशी कोणतीही वस्तू सापडली नाही, ज्यामुळे मृतदेहाची ओळख पटण्यास मदत झाली असती. पोलिसांनी हे खुनाचे प्रकरण सॉल्व करणे एक आव्हान म्हणून घेतले आणि कंडोमच्या पाकिटाच्या मदतीने या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचले. ज्यानंतर या प्रकरणातील दोशींना अटक देखील करण्यात आली. पोलिसांच्या या यशाबद्दल अधिकाऱ्यांकडून कौतुक होत असून, याचा केस स्टडी पोलिस प्रशिक्षण केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. गर्लफ्रेंडच्या लव बाईटमुळे गमावला बॉयफ्रेंडनं जीव; नक्की असं काय घडलं? या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी पोलीस अधीक्षक अजितकुमार सिन्हा यांनी पोलीस स्टेशनच्या पथकाव्यतिरिक्त SWAT टीमची मदत घेतली आणि पाळत ठेवली होती. पण पुढे जाण्यासाठी पोलिसांना काहीच सुगावा लागत नव्हता. तपासादरम्यान कंडोमच्या पॅकेटवर पोलिसांचे पथक अडकत होते. त्यानंतर आंबेडकरनगरसह आसपासच्या जिल्ह्यात कंडोमच्या ब्रँडची विक्री होत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर, पोलिस पथकाने ब्रँडच्या विक्रीचा तपास केला आणि हा ब्रँड दिल्ली-एनसीआर आणि यूपीच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असल्याचे आढळले. यानंतर पोलिसांनी सर्व्हिलन्स सेलच्या माध्यमातून या जिल्ह्यांतील लोकांचे मोबाईल क्रमांक मिळाले जे त्या परिसरातून द्या दिवशी आंबेडकरनगरमध्ये आले होते. तेव्हा पोलिसांना एकून 12 क्रमांकांचे लोकेशन ट्रेस केले. जेव्हा पोलिसांनी या क्रमांकावर फोन केले तेव्हा त्यांना कळले की असे 8 नंबर असे आहेत, ज्यांचे कुटुंबीय त्या भागात राहतात. त्यानंतर एका नंबरवर एका महिलेशी बोलणं झालं. पोलिसांनी महिलेची विचारपूस केली असता तिने सांगितले की, येथील 4 जण सर्कस दाखवण्यासाठी आंबेडकर नगर येथे गेले होते.नत्यावर पोलीस सक्रिय झाले आणि सर्कस दाखवण्यासाठी आलेल्या लोकांचा शोध घेतला. सहारनपूरहून सर्कस दाखवण्यासाठी आलेल्या इम्रान आणि फरमानपर्यंत पोलीस पोहोचले. दोघांची कसून चौकशी करण्यात आली. नंतर या दोघांनी संपूर्ण हत्येचा खुलासा केला आणि या खूनाची केस सॉल्व झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात