जाहिरात
मराठी बातम्या / Viral / गर्लफ्रेंडच्या लव बाईटमुळे गमावला बॉयफ्रेंडनं जीव; नक्की असं काय घडलं?

गर्लफ्रेंडच्या लव बाईटमुळे गमावला बॉयफ्रेंडनं जीव; नक्की असं काय घडलं?

सोर्स : सोशल मीडिया

सोर्स : सोशल मीडिया

लव बाईट कोणाचा जीव घेऊ शकतो याचा कोणी विचार देखील केला नसेल, परंतू असा प्रकार आता समोर आला. जो धक्कादायक आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 26 जून : अनेकांना जोडीदारासोबत रोमान्स करताना लव बाइट करायला आवडते. ही प्रेम व्यक्त करण्याची एक भाषा आहे. लोकांनी आपल्या जोडीदाराला लव्ह बाइट देऊन आपले प्रेम वेगळ्या पद्धतीने व्यक्त करण्याचा नवीन मार्ग अवलंबला आहे. बहुतेकदा हे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जास्त दिसून येते. पण असं असलं तरी देखील. यासंबंधीत एक असा प्रकार समोर आला आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्ही जोडीदाराला लवबाईट करणं आजपासूनच सोडून द्याल. खरंतर लव बाईटमुळे एका प्रियकराने आपले प्राण गमावले आहे. लव बाईट कोणाचा जीव घेऊ शकतो याचा कोणी विचार देखील केला नसेल, परंतू असा प्रकार आता समोर आला. जो धक्कादायक आहे. मुलीला एकटं सोडून बँकेत गेले आई-वडील; घरी येऊन पाहिलं तेव्हा सरकली पायाखालची जमीन हे प्रकरण मेक्सिको सिटीचे आहे, जिथे गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडचा लव्ह बाईट घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. लव बाईटमुळे मुलाला स्ट्रोक आला होता. प्रेयसी खूप वेळ लव बाईट दिल्यामुळे मुलाच्या रक्तात गुठळी तयार झाली आणि नंतर ती गुठळी मेंदूपर्यंत पोहोचली, त्यामुळे त्याला जीव गमवावा लागला. लव्ह बाईटमुळे अनेक नुकसान होऊ शकतात जर एखाद्याने आपल्या जोडीदाराच्या संवेदनशील भागाला चोखायले किंवा चावले तर त्वचेच्या रक्तवाहिन्या फुटतात. यामुळेच लव्ह बाईटच्या ठिकाणी लाल चट्टे दिसतात आणि त्यामुळेच या मुलाला ब्रेन स्ट्रोक झाला होता. असे म्हटले जाते की अशा अनेक घटना अनेकदा घडल्या आहेत, ज्यात लव्ह बाईटमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. Viral : गुगल मॅपवर विश्वास ठेवून गाडी उतरवली थेट समुद्रात आणि… संपूर्ण प्रकरण व्हिडीओत कैद चला जाणून घेऊया लव्ह बाईटचे दुष्परिणाम काय आहेत यामुळे त्वचेवर दीर्घकाळ जखमा होऊ शकतात. त्वचेचे काही आजार होऊ शकतात. जर एखाद्याला त्वचेशी संबंधित संसर्गजन्य रोग असेल तर समोरच्याला देखील तो होऊ शकतो. काही लोकांना लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताभिसरणात समस्या येतात, अशा परिस्थितीत ते लव्ह बाईटमुळे अडचणीत येऊ शकतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात