जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video Viral : चोरांची इमानदारी ज्यांना लूटायचं होतं, त्यांनाच देऊन गेले शंभराची नोट

Video Viral : चोरांची इमानदारी ज्यांना लूटायचं होतं, त्यांनाच देऊन गेले शंभराची नोट

इमानदार चोरांचा व्हिडीओ

इमानदार चोरांचा व्हिडीओ

तुम्ही म्हणाल की चोर आधीच लोकांना लूटतात मग त्यात कसली आली इमानदारी? मग हा व्हिडीओ पाहा

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

दिल्ली, 26 जून : माणसाने कोणतंही काम करताना किंवा बिझनेस करताना इमानदार रहावं असं म्हणतात. काही लोक इमानदारपणे आयुष्यभर काम करतात. तर काही लोक बेइमानी करुन आपलं पोट भरतात आणि ऐशोआरामाचं आयुष्य जगतात. पण तुम्हाला जर सांगितलं की चोर हे इमानदार असतात तर तुमचा विश्वास बसेल? तुम्ही म्हणाल की चोर आधीच लोकांना लूटतात मग त्यात कसली आली इमानदारी? या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तुम्ही चोराची इमानदारी स्पष्टपणे पाहू शकता. या चोरांनी चोरी करुन देखील ज्या लोकांकडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला त्यांनाच परत पैसे आणून दिले. चोरी करण्यासाठी अनोखी शक्कल, चालत्या ट्रकमधून अशा चोरल्या बकऱ्या Video पाहून डोक्याला हाथ लावाल नक्की हे प्रकरण काय? दिल्लीतील शाहदरा येथील फरश बाजार परिसरातील हा संपूर्ण प्रकार आहे. जो एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. दोन चोर स्कुटीवरुन आले, त्यांनी भररस्त्यात एका कपलला गाठलं आणि त्यांना बंदूक दाखवून लूटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याजवळ फक्त 20 रुपये सापडल्याने दरोडेखोरांनी आपल्याकडे असलेली 100 रुपयांची नोट त्यांना दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. दुचाकी चोरीसाठी चोरींनी वापरली अनोखी शक्कल, संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 21 जून रोजी रात्री घडली. पोलिसांनी परिसरातील 200 हून अधिक सीसीटीव्ही स्कॅन करुन दोन्ही दरोडेखोरांना अटक केली आहे. देव वर्मा (19) रा. बुरारी आणि हर्ष राजपूत (31) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, 6 काडतुसे, 30 मोबाईल फोन आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. देव वर्मा हा एका खासगी जीएसटी फर्ममध्ये अकाउंटंट असून हर्ष राजपूतही एका खासगी कंपनीत काम करतो. त्याच्या अटकेने आणखी दोन गुन्ह्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

जाहिरात

शाहदराचे डीएसपी रोहित मीना यांनी सांगितले की, पोलिसांना रात्री 10:55 वाजता दरोड्याची माहिती मिळाली होती. या दाम्पत्याने घटनास्थळी पोहोचलेल्या एसएचओला सांगितले की, दोन स्कूटी स्वार दरोडेखोर त्यांच्या पत्नीचे दागिने लुटण्याच्या इराद्याने तपास करू लागले, पण विशेष काही न सापडल्याने त्यांनी 100 रुपयांची नोट आमच्या हातात देऊन पळ काढला. दरम्यान, या दोघांनी वेलकम परिसरात स्नॅचिंगही केल्याची माहिती मिळाली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात