जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / युवकानं भररस्त्यात नागरिकांवर केला चाकू हल्ला; घटनेत तिघांचा मृत्यू, पाहा घटनेचा थरारक VIDEO

युवकानं भररस्त्यात नागरिकांवर केला चाकू हल्ला; घटनेत तिघांचा मृत्यू, पाहा घटनेचा थरारक VIDEO

युवकानं भररस्त्यात नागरिकांवर केला चाकू हल्ला; घटनेत तिघांचा मृत्यू, पाहा घटनेचा थरारक VIDEO

शुक्रवारी जर्मनीमधील एका व्यक्तीने चाकूने अनेक लोकांवर हल्ला (Germany Knife Attack) केला. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू (Three Killed in Stabbings) झाला आणि बरेच जण जखमी झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 26 जून : शुक्रवारी जर्मनीमधील एका व्यक्तीने चाकूने अनेक लोकांवर हल्ला (Germany Knife Attack) केला. देशाच्या बायर्न राज्यातील वुर्जबर्ग (Wuerzburg) शहरात हा हल्ला झाला. हे ठिकाण फ्रँकफर्टपासून 120 किमी अंतरावर आहे. ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू (Three Killed in Stabbings) झाला आणि बरेच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ट्विटरवर माहिती दिली आहे, की ‘हल्लेखोरावर पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यानंतर त्याच्यावर नियंत्रण मिळवता आले. मात्र, पोलिसांनी या आरोपीच्या उद्देशाबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिला आहे. धक्कादायक!1 लाख 80 हजारांत सौदा;भाऊ असल्याचं सांगत पत्नीचं लावून दिलं दुसरं लग्न Bild newspaper मधील एका रिपोर्टनुसार, या हल्ल्यात किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सहाजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितलं, की या आरोपीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्याला थांबवण्यासाठी त्याच्या पायावर गोळी मारावी लागली. हल्लेखोराचा फोटोही माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे. या फोटोमध्ये आरोपीच्या हातामध्ये धारदार चाकू दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील (Germany Knife Attack Video) समोर आला असून यात पाहायला मिळतं, की रस्त्यावर असलेले लोक या हल्लेखोरावर खुर्ची फेकून त्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

जाहिरात

जगातील सर्वात मोठ्या हत्याकांडासाठी लहान मुलांचा वापर, गोळ्या घातल्या आणि… या हल्लेखोरापासून वाचण्यासाठी लोक इकडे-तिकडे धावत असल्याचंही पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा आरोपी बराच वेळ रस्त्यावर गोंधळ घालत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर एका मोठ्या ऑपरेशननंतर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. आसपासचा परिसर सील केला गेला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. यादरम्यान अनेक नाट्यमय फुटेज समोर आले आहेत. यात एक संशयित चाकूनं रस्त्यावरील लोकांवर हल्ला करताना दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात