औगाडौगौ, 25 जून : दहशतवादी संघटनांकडून लहान मुलांचा वापर जगभरात दहशत निर्माण करण्यासाठी केला जात असल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ही बाब चिंता वाढवणारी आहे. जगातील अनेक भागांमध्ये निष्पाण लहान मुलांचं ब्रेन वॉश करून त्यांना गुन्हेगारीमध्ये ढकललं जात आहे. असाच एक प्रकार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडला होता. आता त्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बुर्किना फासोची (Burkina Faso) सरकार आणि संयुक्त राष्ट्राचं (UN) म्हणणं आहे की, या महिन्याच्या सुरुवातीला ज्या हल्ल्यात 130 हून अधिक लोकांची हत्या (Killed) करण्यात आली होती, ते कट-कारस्थान 12 ते 14 वर्षांच्या मुलांनी केलं होतं. या हल्ल्यात याघा येथील सोल्हान गावातील अनेक निर्दोष लोकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तर अनेक घरांना आग लावण्यात आली होती. बुर्किना फासो हा देश पश्चिम आफ्रिकेतील आहे.
इस्लामिक संघटना लहान मुलांकडून करवून घेतात हल्ले
बुर्किना फासोमध्ये 4 जून रोजी झालेल्या हल्ल्यात जिहादिंनी हल्लेखोर म्हणून (Attackers) लहान मुलांचा वापर केला होता. देशात आतापर्यंत झालेल्या या सर्वात मोठ्या हत्याकांडासाठी (Massacre) हल्लेखोरांनी रात्रीच्या वेळी कारस्थान आखलं होतं. यामध्ये नायजरच्या सीमेला लागून यात्रा प्रांतातील सोल्हान गावातील निवासी मारले गेले. यामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. सरकार या धक्कादायक कारवाईनंतर म्हणलं की, हल्लेखोरांनी गावातील घरं आणि बाजारदेखील जाळून टाकला. झीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा-भीषण! पती झोपेत असताना गुप्तांग कापलं, त्यानंतर बेदम मारहाण करून जीवच घेतला
सरकारचे प्रवक्ता ओसेनी तंबौरा यांनी सांगितलं की, हल्लेखोरांमध्ये अधिकांश लहान मुलं होती. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्राच्या लहान मुलांची एजन्सी यूनिसेफने गुरुवारी सांगितलं की, आम्ही या हल्ल्याचा निषेध करीत आहोत. लहान मुलांकरवी अशा प्रकारं कृत्य घडवून आणणं निंदनीय आहे. हा लहान मुलांच्या मूलभूत अधिकारांचं गंभीर उल्लंघन आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.