राजस्थानमधील कोटा येथून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. काही पैशांसाठी एका पतीने भाऊ म्हणून आपल्या पत्नीचं लग्न दुसऱ्या व्यक्तीशी लावलं. यानंतर पीडित महिलेने पती आणि दलालाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली.
ही घटना कोटा येथून कुन्हाडी येथील आहे. तेथे रवि काली नावाच्या एका तरुणाचं लग्न होत नव्हतं. त्याच्या नातेवाईकांनी तरुणाला सांगितलं की, देवराज नावाची व्यक्ती त्याचं लग्न लावून देईल.
यानंतर रविने देवराजची भेट घेतली. लग्नाबाबत विचारल्यानंतर देवराजने सांगितलं की, मुलीचे नातेवाईक इंदूरमध्ये राहतात. त्यामुळे तेथेच त्याचं लग्न लावून दिलं जाईल. मात्र यासाठी देवराजने 1 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली. आजतकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
यानंतर देवराजने इंदूरमध्ये रविचं लग्न कोमल नावाच्या मुलीसोबत कोर्टात लावलं. लग्नासाठी त्याच्याकडून 1 लाख 80 हजार रुपये घेतले. लग्नानंतर रवि आपल्या पत्नीला घेऊन घरी आला. रविची पत्नी कोमलने दोन दिवसांनंतर आपला भाऊ सोनूशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
रवि घरी पोहोचताच सोनू कोमलला पाहून म्हणाला की, ही त्याची पत्नी आहे आणि ती आधीच विवाहित आहे. इतकच नाही तर तिला मुलंही आहेत. हे ऐकताच रविच्या पायाखालची जमीन सरकली. आणि आपल्यासोबत धोका झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.
रविने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. रविने यात देवराज, पती कोमल आणि तिच्या पहिल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला तेव्हा रविदेखील हैराण झाला. दरम्यान या प्रकरणात आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.