भिवंडी, 18 एप्रिल: भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील पडघाजवळ असलेल्या राहुर गावात जमिनीच्या वादातून निर्माण झालेला वाद विकोपाला गेल्याने तलवार हल्ल्यातील गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींनी तक्रारदारांनी तक्रार मागे घेण्यासाठी इनोव्हा कारने (Innova car) दुचाकीला जोरदार धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सद्दाम मज्जीत चिखलेकर हा युवक गंभीर जखमी झाला आहे.
मागील अनेक महिन्यां पासून फरार असलेले आरोपी यासिन व अझरुद्दीन चिखलेकर (रा.राहुर) या बंधूंसह सय्यम अजीज पटेल (रा .कुडूस ता.वाडा) यांच्या विरोधात दुचाकीला धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र. अखेर पडघा पोलिसांना सहा महिन्यानंतर यासिन चिखलेकर याला गजाआड करण्यात यश मिळाले आहे. मात्र, अन्य आरोपी अद्यापही फरार आहे.
राज्याला remdesivir देणाऱ्या फार्मा कंपनीच्या संचालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
फिर्यादी सद्दाम मज्जित चिखलेकर यांचे वडील मज्जीत चिखलेकर यांचा यासिन व अझरुद्दीन चिखलेकर यांच्यात मागील काही वर्षां पासून जमिनीचा वाद असून या वादातून 20 नोव्हेंबर 2020 रोजी या दोन्ही आरोपींनी मज्जीत व त्यांचा मुलगा अरबाज यांच्यावर तलवारीने दहशत माजवीत जीवघेणा हल्ला केला होता. त्याबाबत पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला. तेव्हापासून यासिन व अझरुद्दीन चिखलेकर हे दोघे ही फरार असून सदरची तक्रार मागे घ्यावी यासाठी गावातील रऊफ अब्दुल रेहमान चिखलेकर याने जखमीचे वडील मज्जीत यांना भेटून तक्रार मागे घे अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील असे धमकावले होते.
त्यानंतर 25 मार्च रोजी फिर्यादी सद्दाम हा जमिनीच्या कामा साठी रात्री घराबाहेर दुचाकी वरून निघाला असता यासिन चिखलेकर याच्या फार्म हाऊस येथून त्याच्या पाळतीवर असलेली इनोव्हा कारने त्यास रस्त्यात गाठून आरोपींनी 'सद्दाम आज तुझे काम तमाम करतो' असा दम देत थांबविण्याचा प्रयत्न केला, असता सद्दाम याने दुचाकीवर गाणे - तुळशी गावाच्या रस्त्याने घेवून गेला तर इनोव्हा पडघ्याच्या दिशेने निघून गेली.
अपुऱ्या आरोग्य सोयी-सुविधांचं आव्हान; पंतप्रधान मोदींनी दिला नवा ACTION PLAN
त्यानंतर सद्दाम हा तुळशी गावातील आपल्या जमिनीवर दुचाकी उभी करून थांबला असता पाळतीवर असलेली इनोव्हा कार त्या ठिकाणी येऊन दुचाकीसह सद्दाम यास जोरदार ठोकर मारून पसार झाली. या जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नात सद्दाम यास जबर दुखापत झाली असूनणत्याच्या दुचाकीचे सुध्दा नुकसान झाले आहे. जखमी सद्दामने नजीकच्या फार्म हाऊसमधील नोकरांच्या मदतीने घरी संपर्क साधून घडलेली हकीकत सांगितल्यावर पडघा पोलीस घटनास्थळी दाखल झाले .या प्रकरणी सद्दाम याने दिलेल्या फिर्यादी वरून यासिन व अझरुद्दीन चिखलेकर बंधू व सय्यम अजीज पटेल या विरोधात वडिलांनी केलेली तक्रार मागे न घेतल्याच्या रागातून जीवे ठार करण्याच्या उद्देशाने हल्ला केला म्हणून आरोपीं विरोधात भादवी कलम 307,323,324,506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून जखमी वर भिवंडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पडघा पोलिसांनी अखेर यासिन चिखलेकर याला गजाआड करण्यात यश आले आहे. मात्र अन्य आरोपी अद्याप फरार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून खैराची तस्करी प्रकरणाचेही गुन्हे दाखल असताना वन विभाग काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Bhiwandi, Crime, Hit and run, Shocking news