BREAKING : महाराष्ट्राला remdesivir देण्यास तयार असणाऱ्या फार्मा कंपनीचा संचालक पोलिसांच्या ताब्यात

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आहे.

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आहे.

  • Share this:
    मुंबई, 17 एप्रिल : राज्याला कोरोनाचा (Corona) विळखा बसला असताना आरोग्य सुविधेचे तीन तेरा वाजले आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. अशातच महाराष्ट्रात रेमडेसीवीर इंजेक्शनचा (remdesivir injection) पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रेमडीसीवीर इंजेक्शनच्या मुद्यावरुन आता सरकार विरुद्ध विरोधक असा नवा सामना पाहायला मिळत आहे. रेमडीसीवीर इंजेक्शनच्या वितरणावरुन नवं राजकारण सुरू झालं आहे. ब्रूक फार्माच्या संचालकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहें. IPL 2021 : 'बुलेट पांड्या', हार्दिकच्या दोन रन आऊटने फिरवली मॅच, भन्नाट VIDEO ब्रूक फार्माचे संचालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर येताच भाजपच्या नेत्यांची पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आहे. अखेर डॉ.हर्षवर्धन आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाली चर्चा, दिले महत्त्वाचे आश्वासन भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आहे. महाराष्ट्रात रेमडीसीवीर इंजेक्शन देण्यास तयार असलेल्या पुरवठादाराला ताब्यात घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 एप्रिल रोजी भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी दमन येथे जाऊन ग्रुप फार्मा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला (Group Farm Pvt. Ltd. daman) भेट दिली होती. या कंपनीकडून मोठा इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे भाजपकडून राज्याला 50,000 रेमडेसीवीर इंजेक्शनची देण्याची घोषणा करण्यात आली होती. या भेटीच्या वेळी  राजेश डोकनिया हे त्यावेळी उपस्थितीत होते.
    Published by:sachin Salve
    First published: